शिराळा पंचायत समिती विभागाकडील सर्व शिक्षण अभियान कडील रिक्त जागा भरण्या संदर्भात गटविकास अधिकारी संतोष राऊत यांना दिलेल्या निवेदन प्रसंगी बोलत होते. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष सुखदेव पाटील,रणजीतसिंह नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी नाईक म्हणाले,शिराळा तालुका हा डोंगरी तालुका असून ९१ ग्रामपंचायत द्वारे सर्व कामकाज चालते तालुक्याची व्याप्ती डोंगर दऱ्या, खोऱ्या मध्ये व्यापला आहे. त्यामुळे कामकाज करणे अवघड असताना पंचायत समितीकडील सर्व शिक्षण विभागाकडील कर्मचारी संख्येमध्ये प्रचंड कमतरता दिसून येत आहे. आज तालुक्यांमध्ये दोन पदावर कर्मचारी कार्यरत कार्यरत असून ७० टक्के जागा रिक्त ठेवून प्रशासनाने शिराळा तालुक्यावर फार मोठा अन्याय केला आहे. अशा स्थितीत तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीवर फार मोठा परिणाम होत आहे.
शैक्षणिक व प्रशासकीय कामात अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाकडील महत्त्वाचे असणारे सर्व शिक्षण विभागाकडे असणारा अपुरा कर्मचारी संख्या विचारात घेऊन नवीन पदाची नियुक्ती करणे गरजेचे आहे . यापूर्वी तालुक्यातील रिक्त पदे भरण्यासाठी वारंवार प्रशासनाकडे मागणी केली होती. परंतु जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये शंभर टक्के पदे भरली असून शिराळा या डोंगरी तालुक्यावर फार मोठा अन्याय केला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी १५ डिसेंबर पर्यंत रिक्त पदाची नियुक्ती करावी. अन्यथा १६ डिसेंबर ला पंचायत समिती कार्यालयाला टाळे ठोकून ,धरणे आंदोलन केले जाईल.
यावेळी सम्राट शिंदे, सरपंच विजय महाडिक, श्रीकृष्ण कुसळे, राजू पाटील ,प्रताप दिलवाले, वसंत पाटील, प्रकाश जाधव ,आबा पाटील उपस्थित होते. या निवेदनावर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सत्यजित देशमुख, रणधीर नाईक, माजी सभापती हणमंतराव पाटील, सुखदेव पाटील, रणजितसिंह नाईक, के डी पाटील व सरपंच यांच्या सह्या आहेत .
अंत्री गणपती गीत
मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"
कोरोनता कोण आपलं होत .....पहा मराठी लघुचित्रपट कहर
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
0 Comments