आविष्कार कल्चरलचा स्नेह मेळावा |Meet the affection of Avishkar Cultural
आविष्कार कल्चरलचा स्नेह मेळावा |Meet the affection of Avishkar Cultural
इस्लामपूर:आपल्याबरोबर दुसऱ्यांचाही विचार केला तर जीवनात निश्चितपणे सुखी व आनंदी रहाल असा विश्वास बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डॉ.सुरेंद्र काटकर यांनी व्यक्त केला.
आविष्कार कल्चरलचा स्नेह मेळावा |Meet the affection of Avishkar Cultural
राजारामनगर येथे आविष्कार कल्चरल ग्रुपच्या स्नेह मेळाव्यात ते बोलत होते. पुरातत्व विषयाचे अभ्यासक सचिन पाटील (कुरळप),आविष्कारचे मार्गदर्शक मोहन चव्हाण,अध्यक्ष सुनील चव्हाण,कार्याध्यक्ष प्रा.प्रदीप पाटील,माजी कार्याध्यक्ष नजीर शेख,सचिनकाका पाटील, अनिल जाहीर,सर्जेराव यादव,पेठचे अतुल पाटील,प्रा.कृष्णा मंडले,धनंजय भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
आविष्कार कल्चरलचा स्नेह मेळावा |Meet the affection of Avishkar Cultural
लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी आविष्कारचे सचिव स्व.राजेंद्र घोरपडे,माजी अध्यक्ष स्व.सुधीर पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
आविष्कार कल्चरलचा स्नेह मेळावा |Meet the affection of Avishkar Cultural
डॉ.काटकर म्हणाले,सुख व आनंद शरीराशी नव्हे,तर मनाशी निगडीत आहे. निस्सीम आनंद,अमर्याद जीवन आणि अनंत ज्ञान ही माणसाच्या जीवनातील उद्दीष्टे असू शकतात. माणूस सध्या गाडी,बंगला आदी वस्तूच्या मागे लागला आहे. जीवनाचे साध्य काय आणि साधन काय? याच्या चिंतनातून जीवनाला योग्य दिशा मिळू शकते. माणसात ईश्वर पाहून त्याच्यावर प्रेम करा,निष्काम कर्माला महत्व द्या.
आविष्कार कल्चरलचा स्नेह मेळावा |Meet the affection of Avishkar Cultural
सचिन पाटील म्हणाले,आपण गेल्या २१ वर्षात ५० किल्ल्यांचे ट्रेकिंग केले आहे. यातून पुरातत्व विषयाची गोडी लागली आहे. ब्रिटिश लायब्ररीमध्ये पन्हाळा किल्ल्याबद्दल लिहिलेली ८९ पुस्तके मिळाली. यानंतर न्युझिलंड,ऑस्ट्रेलिया,अमेरिका आदी देशात आपण पन्हाळा किल्ल्याबद्दलच्या पुस्तकांचा शोध घेतला. पन्हाळा किल्ल्यावरती देशातील पाच शिवलिंगपैकी एक शिवलिंग,सारुद्दीन बाबाच्या तुरबतवर कवी शिराज यांच्या नाईट अँगल कवितेच्या ओळी,वाघ दरवाजा येथे गणेशा मूर्ती आदी पाच नवीन बाबी शोधल्या आहेत. आपल्या भागातील दगडी कोडी ही आपल्या भागातील इंडो-रोमन व्यापाऱ्याच्या खुणा आहेत. डॉ.पप्पू यांनी १९६१ साली वाळवा,नागठाणे येथे दगडी हत्यारे मिळाल्याचे लिहिले आहे. म्हणजे आपण या भागातीलच रहिवाशी असून आपला भाग समृद्ध होता.
आविष्कार कल्चरलचा स्नेह मेळावा |Meet the affection of Avishkar Cultural
प्रारंभी माजी कार्याध्यक्ष नजीर शेख यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सचिव विश्वनाथ पाटसुते यांनी आभार मानले. प्रा.कृष्णा मंडले यांनी सूत्र संचालन केले.
आविष्कार कल्चरलचा स्नेह मेळावा |Meet the affection of Avishkar Cultural
यावेळी उपअभियंता सुभाष पाटील अतुल केकरे,रेठरेधरणचे योगेश पाटील,माजी अध्यक्ष सतीश पाटील,माजी संचालक डी.बी.पाटील,डॉ.अतुल मोरे,गायक शेखर गायकवाड,डॉ.उदय पाटील,संजय चव्हाण, योगेश पाटील,राजवर्धन लाड,राजेंद्र पाटील, विकास कोरे,अजय थोरात,विजय नायकल व आविष्कारचे कार्यकर्ते उपस्थित होते.
आविष्कार कल्चरलचा स्नेह मेळावा |Meet the affection of Avishkar Cultural
''मारू का हवा'' चित्रपट पाहण्यासठी STAR 5.LIVE APP डाऊनलोड करा आणी घ्या घर बसल्या
धम्माल विनोदी चित्रपटाची मजा लुटा आणि पोटभर हसा .
पहा या चित्रपटाची झलक फक्त आपल्यासाठीच
''मारू का हवा'' आता STAR 5.LIVE APP वर प्रदर्शित| Maru ka hawa Display on STAR 5.LIVE APP
''मारू का हवा'' चित्रपट पहा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.
आपणाला मनोरंजना बरोबर बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी
पहिल्या लकी ड्रॉ ची प्रश्नमंजुषा सोमवार १३ डिसेंबर ते रविवार १९ डिसेंबर २०२१
महिलासाठी - खण साडी
पुरुषांच्यासाठी - मनगटी घड्याळ
लहान मुलांच्यासाठी- स्कुल बॅग
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पहिल्या २५ भाग्यवान स्पर्धकांचा लकी ड्रॉ च्या ठिकाणी ''मारू का हवा'' चे दिग्दर्शक व कलाकार यांच्या हस्ते सत्कार होईल.
ही सोडत लकी ड्रॉ पद्धतीने प्रत्येक आठवड्याला काढली जाईल.
पहिला लकी ड्रॉ रविवार १९ डिसेंबर २०२१
मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"
कोरोनता कोण आपलं होत .....पहा मराठी लघुचित्रपट कहर
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
0 Comments