बेकायदेशीर सावकारी प्रकरणी इस्लामपूरचा मनसे शहर अध्यक्ष सचिन उर्फ सनी खराडे रा. हनुमान नगर इस्लामपूर या खाजगी सावकाराला पोलिसांनी अटक केली असून त्यास प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी इरलामपूर येथे हजार केले असता २९ रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या घराच्या झडती घेवून पोलिसांनी त्याच्याकडून रोख १५ लाख व कागदपत्रे जप्त केली आहेत.
बाजीराव दिनकर पाटील रा इस्लामपूर (ता वाळवा) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन खाजगी सावकार- सचिन ऊर्फ सनी मारुती खराडे वय ३५ वर्षे, रा- हनुमाननगर इस्लामपूर ता. वाळवा यास पोलिसांनी अटक केली. त्याचेकडून १५ लाख रुपये हस्तगत करण्यात आले असून त्यांने मुदल व व्याजाचे मोबदल्यात घेतलेले तीन चेक जमीनीचे साठेखत इसारतपत्र अशी कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
बेकायदेशीर सावकारी व्याजाने पैसे देणारे बालम हनिफ जमादार रा गोळेवाडी पेठ (ता वाळवा ), हिंदूराव बबन मोरे रा कापूसखेड (ता वाळवा), एक सागली येथील व्यापारी नांव पत्ता माहीत नाही,सांगली येथील तीन व्यापारी नाव पत्ता माहीत नाही,पवार रा. वाळवा पुर्ण नाव पत्ता माहीत नाही, जगन्नाथ किसन चिखले रा नवेखेड ता. वाळवा,सुजित पाटील रा. इरलामपूर ता वाळवा, एक कापड दुकानदार इस्लामपूर ( नाव पत्ता माहीत नाही, धैर्यशिल संताजीराव पाटील रा कामेरी,संभाजी शिवाजी पवार रा- होळकर दुध डेअरीजवळ इस्लामपूर, ज्ञानदेव जाधव रा- सातवे ता- हातकणंगले जि कोल्हापूर वगैरे लोकांच्यावर गुन्हा दाखल होता.
सदर गुन्हयामध्ये बालम हनिफ जमादार, हिंदूराव बबन मोरे, संभाजी शिवाजी पवार, धैर्यशील संताजीराव पाटील यांना अटक केली असून यांचेकडून घरझडती मध्ये रोख रक्कम- ०१,०८,१००/-, कोरे चेक, मोटर सायकल वगैरे कागदपत्र हस्तगत केली आहेत.
अपर पोलीस अधीक्षक दुबुले मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण हे तपास करीत आहेत .अशा प्रकारे आणखीन कोणाची वरील आरोपींच्या विरुध्द तक्रार असलेस त्यांनी इस्लामपूर पोलीस ठाणेस संपर्क करावा. असे आवाहन केले आहे.
0 Comments