आय.पी.एस. निमिष पाटील यांचा सोमवारी सत्कार|IPS Nimish Patil felicitated on Monday
शिराळा:पाडळीवाडी ता. शिराळा येथील निमिष दशरथ पाटील हे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये देशात ३८९ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. त्यांची भारतीय पोलिस सेवेमध्ये निवड झालेल त्यांच्या भव्य नागरी सत्कारचे आयोजन सोमवारी १३ डिसेंबरोजी पाडळी येथे सायंकाळी ५ वाजता करण्यात आलेला आहे.
सांगलीचे जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षित गेडाम यांच्या हस्ते त्यांचा सत्कार होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजारामबापू पाटील ज्ञानप्रबोधिनी इस्लामपूरचे अध्यक्ष शामराव पाटील असणार आहेत.
निमिष पाटील यांनी मुंबई येथील सरदार पटेल महाविद्यालयातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले, हैदराबाद येथून भारतीय पोलीस सेवेचे प्रशिक्षण पूर्ण होऊन ते उत्तर प्रदेश पोलीस मध्ये रूजू होणार आहेत. त्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल ग्रामस्थांच्यावतीने या कौतुक सोहळ्याचे आयोजन केले आहे.
यावेळी देशातील सर्वोत्कृष्ट पोलिस ठाण्यांमध्ये निवड झाल्याबद्दल शिराळा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांचाही सत्कार संपन्न होणार आहे. गावातील तरुण, पारायण सोहळा समिती व समस्त ग्रामस्थ या सत्कार सोहळ्याची जय्यत तयारी करत आहेत .
अंत्री गणपती गीत
मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"
कोरोनता कोण आपलं होत .....पहा मराठी लघुचित्रपट कहर
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
0 Comments