पाव किलो वजनाचा शंख असलेली जाइंट आफ्रिकन गोगलगाय |Giant African snail weighing १/४ kg
पाव किलो वजनाचा शंख असलेली जाइंट आफ्रिकन गोगलगाय |Giant African snail weighing १/४ kg
देववाडी (ता. शिराळा) येथील जोतिबा मंदीरात पाठीवर पाव किलो वजनाचा शंख असलेली जाइंट आफ्रिकन गोगलगाई आढळली आहे.
पाव किलो वजनाचा शंख असलेली जाइंट आफ्रिकन गोगलगाय |Giant African snail weighing १/४ kg
देववाडीतील जोतीबा मंदिरात असणाऱ्या या गोगलगायीच्या पाठीवर तीच्या वजनापेक्षा मोठ्या आकाराचा शंख तयार झाला असल्यामुळे तीला जास्त हालचाल करता येत नाही, गावाच्या दक्षिणेला जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ असणाऱ्या जोतिबाच्या छोट्या मंदिरात तीचा वावर आहे.
पाव किलो वजनाचा शंख असलेली जाइंट आफ्रिकन गोगलगाय |Giant African snail weighing १/४ kg
पंधरा दिवसापूर्वी ज्ञानदेव खोत यांना गोगलगाय दिसली. सुरवातीला आकाराने लहान असणारा शंख हळूहळू मोठा होत असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या दोन दिवसापासून शंखाचा आकार मोठा झाल्यामुळे आता गोगलगायी ला गतीने चालता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.
पाव किलो वजनाचा शंख असलेली जाइंट आफ्रिकन गोगलगाय |Giant African snail weighing १/४ kg
याबाबत वारणा महाविद्यालय वारणानगरचे प्रा.डॉ .ए.आर.भुसनार म्हणाले, या गोगल गाईला जाइंट आफ्रिकन गोगल गाई या नावाने ओळखले जाते, गोगलगाईचे मूळ ठिकाण पूर्व आफ्रिका असून सद्या ती जगातील अनेक देशांमध्ये सापडते, तिचा इतर देशामध्ये प्रसार कसा झाला याबद्दल ठोस माहिती नाही पण Aquarian मध्ये पाळण्यासाठी आणि तत्सम कारणासाठी तीला लोकांनी आणले असावे व नंतर तीला सोभोवतली सोडून दिले असावे असे शास्त्रज्ञाना वाटतें, हिची वाढ वेगाने होत असून थंड व अद्रता युक्त वातावरण या गोगलगाईसाठी पोशक असते. ही जागतीक दृष्ट्या महत्वाची असलेली शेतीपिकावरील कीड आहे. ही मोठया संखेने आल्यास पिकांची मोठ्याप्रमाणावर नुकसान करते .तसेच पिकावर वेगवेगळ्या रोगाचा प्रसार करते, महाराष्ट्रामध्ये या गोगल गाईचा प्रसार अलीकडच्या काळामध्ये आढळून येतं आहे.
पाव किलो वजनाचा शंख असलेली जाइंट आफ्रिकन गोगलगाय |Giant African snail weighing १/४ kg
शेतीपिकावरील हि घातक कीड असून,ही गोगलगाय अख्याटीनिडी या कुळात येते, तिचे शास्त्रीय नाव लिस्साचाटीना फुलिका असे आहे.ती भारतीय नाही १९३१ साली चायना मध्ये येथे वास्तव्य आढळले, गहू, भात, लहान ऊसासाठी घातक आहे. ज्वारीच्या आकाराची ती अंडी घालते , नर, मादी प्रमाण कमी असल्यामुळे उत्पत्ती कमी आहे. पिकांच्या पासून रोगाचा प्रसार मोठ्या प्रमाणात ती करते. आफ्रिकेत पिकावरील मोठी किड म्हणून तिची ओळख आहे, भारतात सामान्यता आढळणाऱ्या गोगलगायी पावसाळ्यातच बाहेर पडतात त्यांचे शरीर नाजुक असते ,या गोगलगाय पिकांचे कमी नूकसान करतात.
पाव किलो वजनाचा शंख असलेली जाइंट आफ्रिकन गोगलगाय |Giant African snail weighing १/४ kg
0 Comments