चांदोलीचे पर्यटन तीन दिवस बंद| Chandoli tourism closed for three days
चांदोली परीसरातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व चांदोली धरण ३०,३१ डिसेंबर ते १ जानेवारी असे सलग तीन दिवस पर्यटकांसाठी बंद राहणार असल्याची माहितीत चांदोलीचे वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे व वारणा प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता मिलिंद किटवाडकर यांनी दिली.
यावेळी ते म्हणाले, २०२१ या सरत्या वर्षाला निरोप देताना व २०२२ या नविनवर्षाचे स्वागत करताना अनेक पर्यटक चांदोली परीसरात येतात. यामध्ये काही पर्यटक अतिउत्साही असतात. त्यामुळे त्यांचा दंगा,गोंगाट ,जल्लोषामुळे सुरु असतो. त्यामुळे चांदोली राष्ट्रीय उद्यानामधील वन्यजीव तसेच वन्यजीवांची अाश्रयस्थळे यांना धोका पोहोचला जातो. म्हणून उद्यानातील वन्यजीवांचा धोका टाळण्यासाठी व धरण परिसरात ही कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ही बंदी घालणेत आली आहे.
रविवार (ता.२ )पासून धरण व अभयारण्य पुन्हा पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहे .याची पर्यटकांनी नोंद घ्यावी असे आवाहन चांदोली वन्यजीव विभाग तसेच धरण प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
0 Comments