दत्तादादा शेळके स्मृतिदिनानिमित्त वाळव्यात रक्तदान शिबिर| Blood donation camp in the desert on the occasion of Dattadada Shelke Memorial Day
दत्तादादा शेळके स्मृतिदिनानिमित्त वाळव्यात रक्तदान शिबिर| Blood donation camp in the desert on the occasion of Dattadada Shelke Memorial Day
वाळवा:वाळवा येथील माजी सरपंच, हुतात्मा संकुलाचे संस्थापक स्वर्गीय दत्तादादा शेळके यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त एक जानेवारी रोजी वाळव्यात रक्तदान शिबीर आणि गुणवंतांचा सत्कार अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती काँग्रेसचे नंदकुमार शेळके व ग्रामपंचायतीचे माजी सदस्य चंद्रशेखर शेळके यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
दत्तादादा शेळके स्मृतिदिनानिमित्त वाळव्यात रक्तदान शिबिर| Blood donation camp in the desert on the occasion of Dattadada Shelke Memorial Day
यावेळी ते म्हणाले,लोकनेते दत्तादादा शेळके सामाजिक प्रतिष्ठान व भारती हॉस्पिटल ब्लड बँक सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता स्वर्गीय दत्तादादा यांच्या प्रतिमेचे पूजन होईल. त्यानंतर गावातील आरोग्य सेविका' आशा सेविका' डॉक्टर, पत्रकार, सफाई कामगार, सामाजिक कार्यकर्ते यांचा कोरोना योद्धा व सामाजिक कार्याबद्दल सत्कार होईल.
स्वर्गीय लोकनेते दत्तादादा शेळके यांनी क्रांतिभूमी वाळवा या ऐतिहासिक नगरीच्या विकासाचा पाया रचला, अनेक गोरगरिबांची कामे केली, डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्यांच्या प्रगतीसाठी काम केले, अनेक शाळा व प्रशासकीय इमारती गावात स्थापन केल्या. हुतात्मा शिक्षण उद्योग समूहाच्या स्थापनेमध्ये त्यांनी सिंहाचा वाटा उचलला अशा या लोकनेत्याच्याबद्दल श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी वाळवा गावातील आणि परिसरातील पंचक्रोशीतील अनेक मान्यवर वाळवा येथे १ जानेवारीला येणार आहेत.
दत्तादादा शेळके स्मृतिदिनानिमित्त वाळव्यात रक्तदान शिबिर| Blood donation camp in the desert on the occasion of Dattadada Shelke Memorial Day
0 Comments