शिराळा: मेणी (ता. शिराळा) येथील कऱ्हाड-शेडगेवाडी राज्य मार्गावरील वळणावर लग्न समारंभा नंतर परत निघालेली ट्रॅव्हल्स पलटी होऊन झालेल्या अपघातात ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत चालक राजुसिंग राजपूत याच्या विरोधात कोकरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ही घटना गुरुवारी मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास घडली. याबाबत गाडीतील आचारी ताराचंद रामनिवास साहू (वय ३५) रा. पिसागन जि.अजमेर राज्यस्थान यांनी कोकरूड पोलिसात फिर्याद दिली आहे.
याबाबत कोकरूड पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, गीवू राजस्थान येथील आचारी ताराचंद आपल्या सहकाऱ्या समवेत ओम-शांती ट्रॅव्हल्स क्रमांक आर.जे. ०९ पी.ए.४१४७ गोवा येथील लग्न समारंभाचे काम संपल्या नंतर रत्नागिरी, आंबाघाट,मालकपूर, कोकरूड, शेडगेवाडी मार्गे कराडवरून राजस्थानला निघाले होते. दरम्यान कराड-शेडगेवाडी राज्य मार्गावर मेणी येथे आली असता चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने बस स्थानका पासून १०० मीटर अंतरावर असलेल्या वळणावरील ओढ्याच्या पुलाच्या लोखंडी संरक्षण ग्रीलला धडकून पुलावरून सुमारे २० फूट खाली कोसलुन पलटी झाली.
यामध्ये ट्रॅव्हल्स मधील आचारी ताराचंद रामनिवास साहू यांच्या सह त्याचे सहकारी चंद्र प्रकाश माळी,पिंटू गुज्जर, अशोक प्रजापती, जसराज चाट, गोपाल, कान्हा जाट, चालक राजुसिंग राजपूत व क्लिनर राजेंद्र सिंग असे नऊ जण जखमी झाले आहेत. त्यांना कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामध्ये ट्रॅव्हल्सचे सुमारे सात ते आठ लाख रुपयांचे नुकसान झाले असून अपघात एवढा मोठा झाला असताना ही कोणतीही जीवितहानी झाली नाही. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक शिवाजी जाधव करत आहेत.
अंत्री गणपती गीत
मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"
कोरोनता कोण आपलं होत .....पहा मराठी लघुचित्रपट कहर
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
0 Comments