शिराळा:चिखली ता. शिराळा येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज शेवटच्या दिवशी अखेर ५३ व पहिले ३ असे एकूण ५६ अर्ज दाखल झाले आहेत.
यामध्ये विश्वास कारखान्याचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक,उपाध्यक्ष, माजी आमदार बाबासाहेब पाटील,विराज उद्योगसमूहाचे अध्यक्ष विराज नाईक,रणजितसिंह नाईक, सम्राटसिंह शिंदे,शोभाताई दिलीप गायकवाड (नाईक), अभिजित नाईक यांच्यासह आज अखेरच्या दिवशी ५६ अर्ज दाखल झाले आहेत.
अन्य अर्ज दाखले केलेले उमेदवार शकुंतला शेळके(शिराळा) ,बाबासो पाटील (सागाव),सुरेश पाटील (मांगले),शुभांगी पाटील, अजित पाटील चरण, नाना माळी वाडीचरण (ता.शाहुवाडी),कोमल पाटील बांबवडे,अनिता चौगुले आरळा, सुहास पाटील कोकरुड, राजाराम पाटील वाकुर्डे खुर्द, बाळासो पाटील पाडळेवाडी, बिरु आंबरे पुनवत, विश्वास कदम शिराळा, संभाजी पाटील काळुंद्रे, शिवाजी पाटील प.त.वारुण, विष्णू पाटील बिळाशी, यशवंत निकम शिराळा,
संदिप तडाखे मांगले, हंबीरराव पाटील भेडसगाव, तुकाराम पाटील पुसार्ले ता.शाहुवाडी, यशवंत दळवी मालेवाडी, आनंदा पाटील पाटणे ता.शाहुवाडी, प्रताप पायमल चिखलवाडी, बजरंग चरापले मांगले, उषाताई दशवंत मांगले, विशाल पाटील कांदे यांनी आपले अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी संपत खिल्लारी यांच्याकडे दाखल केले आहेत.
तर सदर अर्जांची छानणी सोमवार दि १३ रोजी होणार आहे. तसेच अर्ज माघारीची अंतिम तारीख दि १४ ते२८ डिसेंबर पर्यंत आहे. त्याच प्रमाणे २९ डिसेंबर रोजी उमेदवार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आवश्यक असल्यास ९ जानेवारी २०२२ रोजी मतदान होणार असून ११ जानेवारी रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संपत खिल्लारी व तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिली.
अंत्री गणपती गीत
मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"
कोरोनता कोण आपलं होत .....पहा मराठी लघुचित्रपट कहर
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
0 Comments