BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

वारणा कालव्यासाठी नाबार्ड कडून ३१४.४० कोटी | 314.40 crore from NABARD for Warna canal

 वारणा कालव्यासाठी नाबार्ड कडून ३१४.४० कोटी | 314.40 crore from NABARD for Warna canal

 वारणा कालव्यासाठी नाबार्ड कडून ३१४.४० कोटी | 314.40 crore from NABARD for Warna canal

शिराळा : पाटबंधारे प्रकल्पाच्या उर्वरित कामांसाठी आवश्यक ३१४.४०  कोटीचा निधी नाबार्ड  बँकेने RIDF XXVII या मालिकेद्वारे अर्थसहाय्य म्हणून मंजूर केले आहे. याकामी राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री  जयंतराव पाटील यांनी विशेष  सहकार्य केले असल्याची माहिती  माहिती आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली.

 वारणा कालव्यासाठी नाबार्ड कडून ३१४.४० कोटी | 314.40 crore from NABARD for Warna canal

चिखली ता. शिराळा  येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.  यावेळी नाईक  म्हणाले, हा निधी नाबार्डकडून सन २००२२ -२३  ते २४ -२५  या तीन वर्षांत अनुक्रमे रु.१२५.७६  कोटी, रु.१२५.७६ कोटी व रु.६२.८८  कोटी रुपये असा उपलब्ध होणार आहे. या निधीतून सांगली जिल्ह्यातील डावा कालवा किमी ३८  ते ७०  रिळे, फुफीरे, शिराळे खुर्द, ढोलेवाडी, सागाव, नाटोली, चिखली, कांदे, मांगले, लादेवाडी (ता. शिराळा) ते चिकुर्डे (ता. वाळवा) पर्यंतची सर्व कामे पूर्ण होतील . डावा कालव्याचे एकूण सिंचन क्षेत्र ५१  हजार ५९७  हेक्टर आहे. त्यापैकी १६  हजार ५११  हेक्टरला पाणी मिळाले आहे. या निधीतून उर्वरीत कामे पूर्ण होऊन डाव्या कालव्यावरील वरील गावातील उर्वरीत ९  हजार ९८३  हेक्टर क्षेत्राला कालवा प्रवाही व उपसा सिंचनाद्वारे पाणी मिळणार आहे.

 वारणा कालव्यासाठी नाबार्ड कडून ३१४.४० कोटी | 314.40 crore from NABARD for Warna canal

डाव्या कालव्याची माती कामे, कालव्याचे अस्तरीकरण, बांधकामे, हाती घेण्यात आली असून मांगले येथील मोरणा जलसेतूचे कामही पूर्ण होणार आहे. त्यामुळे शिराळा विधासभा मतदार संघातील शेती व शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. बरीच वर्षे बहुचर्चित राहीलेला डावा कालवा आता पुर्ण होणार आहे. गेल्या दोन वर्षात वारणा प्रकल्पासाठी प्रत्येक अर्थसंकल्पात १००  कोटी रुपये प्रमाणे २००  कोटी रुपये  जयंतराव पाटील यांनी दिले आहेत.  वारणा प्रकल्पास जसे २००  कोटी रुपये दिले गेले त्याच प्रमाणे वाकुर्डे बुद्रूक उपसा जलसिंचन योजनेसाठीही २००  कोटी रुपये दिले आहेत. त्यातून  ही योजना पूर्ण करण्याचे युद्धपातळीवर काम सुरू आहेत.

 वारणा कालव्यासाठी नाबार्ड कडून ३१४.४० कोटी | 314.40 crore from NABARD for Warna canal

 अल्पावधीतच वाकुर्डे योजनेचे पाणी परिसरातील शेतात खळखळणार आहे. त्यातून नेहमी पाण्यापासून वंचित असणाऱ्या शेती क्षेत्राला मिळणार आहे. वारणा प्रकल्पातून डावा व उजवा असे दोन कालवे जातात. त्याचे एकूण ९१  हजार ३५०  हेक्टर सिंचन क्षेत्र आहे. त्यापैकी ७४  हजार ८३९  हेक्टर क्षेत्राला वारणा प्रकल्पाद्वारे पाणी मिळाले आहे. उजवा कालवा ३९  हजार ७५३  हेक्टर क्षेत्राला यापूर्वी पाणी उपलब्ध झाले आहे. उजवा कालवा किमी ३१  ते ६० मधील उर्वरित सर्व कामे निश्चितपणे पूर्ण होणार आहेत. त्यातून उर्वरीत ६  हजार ५२८  हेक्टर क्षेत्रास या मिळालेल्या निधीतून कामे पूर्ण होऊन पाणी मिळणार आहे. राज्यातील महाआघाडी सरकार हे शेतकरी, कष्टकरी सर्वसामान्याच्या हिताचे आहे.

 वारणा कालव्यासाठी नाबार्ड कडून ३१४.४० कोटी | 314.40 crore from NABARD for Warna canal

Post a Comment

0 Comments