वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू | Leopard killed in vehicle crash
वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू | Leopard killed in vehicle crash
वाठार (ता .कराड) येथे आज रविवारी सकाळी वाहनाच्या धडकेत जखमी झालेला बिबट्या मृतावस्थेत आढळला. . स्थानिक ग्रामस्थांनी याबाबतची माहिती वनविभागाला कळवल्यानंतर वनविभागाच्या पथकाच्या पथकाने घटनास्थळी भेट देवून पंचानामा केला .
वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू | Leopard killed in vehicle crash
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सकाळी 5.30 वाजता बामणोलीचे वनक्षेत्रपाल बाळकृष्ण हसबनीस यांना त्यांच्या सहकारी यांनी राष्ट्रीय महामार्ग ४ वर कराड तालुक्यातील वाठार जवळ असलेल्या उड्डानपुला जवळ एक बिबट्या जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेला असल्याची माहिती दिली. त्यानंतर हसबनीस यांनी कराडचे वनक्षेत्रपाल तुषार नवले व मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना कळवले. वनक्षेत्रपाल कराड व त्यांचे सहकारी वाठार येथे जाऊन पाहणी केली असता बिबट्या मृत अवस्थेतील रस्त्यावर पडलेला आढळला. त्यांतर पंचनामा करून शवविच्छेदन साठी कराड पशुसंवर्धन दवाखान्यात घेऊन आले . पशुसंवर्धन अधिकारी डॉ बोर्डे व त्यांच्या सहकाऱ्यांनी यांनी शवविच्छेदन केले.
वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू | Leopard killed in vehicle crash
सदर बिबट्या हा पूर्ण वाढ झालेला नर आहे . तसेच त्याचे वजन साधारण 45 किलो आहे . तर वय अंदाजे 4.5 ते 5 वर्ष आहे . डाव्या बाजूच्या शरीरावरील कंबरेवर जोरात कोणत्या तरी अज्ञात वाहनाने जोरात धडक बसल्याने मोठ्या प्रमाणावर अंर्तगत रक्तस्त्राव झाले असल्याचे शवविच्छेदन मध्ये स्पष्ट झाले . बिबट्याचे सर्व अवयव , मिश्या , सर्व नखे , सर्व दात हे सुस्थितीत होते . अज्ञात वाहनाचा तपास सुरू आहे . सहायक वनसंरक्षक महेश झांजुर्णे वनक्षेत्रपाल तुषार नवले , मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे , वनपाल सावखंडे , वनपाल बाबुराव कदम , वनरक्षक अरुण सोळंकी , रमेश जाधवर , अश्विन पाटील व वनकर्मचारी यांच्या उपस्थितीत बिबट्याचे दहन करण्यात आले .
वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू | Leopard killed in vehicle crash
0 Comments