तांदुळवाडीत TPL चा थरार | thrill of TPL in Tandulwadi
तांदुळवाडीत TPL चा थरार | thrill of TPL in Tandulwadi
आनंदा कांबळे \ तांदुळवाडी
कित्येक वर्षे खेळापासून दुरावलेले तांदुळवाडी ( ता वाळवा ) हे गाव तांदुळवाडी प्रिमीयर लीग ( T P L ) क्रिकेट मुळे पुन्हा रिचाज॔ झाले असुन T P L चा थरार पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी होत असल्याने या सामन्याना वेगळीच रंगत चढली असुन उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे .
तांदुळवाडीत TPL चा थरार | thrill of TPL in Tandulwadi
२५ ते ३० वर्षापूर्वी गावात नवयुग तरूण मंडळाच्या माध्यमातून राज्यस्तरीय कबड्डी सामने भरवले जात असत. आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडु या मातीत खेळून गेले आहेत. नवयुग तरूण मंडळाची कबड्डी टिम पश्चिम महाराष्ट्रतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेली टिम म्हणून ओळखली जात होती . याच गावचे महादेव मोहिते व विजयानंद पाटील दोन कबड्डी खेळाडु विद्यापीठ झोनला खेळले. कालांतराने नवयुग तरूण मंडळात कबड्डी खेळाडु तयार झाले नसल्याने खेळ बंद पडला.
तांदुळवाडीत TPL चा थरार | thrill of TPL in Tandulwadi
कबड्डीचे सामनेही बंद झाले . ५ ते ६ वर्षापूर्वी काही मंडळानी सामने भरवले पण ते काही काळापुरतेच मर्यादित राहिले. पुन्हा ते ही बंद झाले .तेव्हापासून या गावात कबड्डी खेळलीच नाही .कबड्डीची पंढरी म्हणून ओळख असणारे तांदुळवाडी गाव खेळापासून दुर गेले. . गेल्या वर्षीपासून तांदुळवाडी प्रिमीयर लीग सुरू झाली .तेव्हा थोडा लोकांचा प्रतीसाद कमी होता . पण या वर्षी सर्वांनी एकजूटीने या प्रिमीयर लीगला सहकार्य केल्याने दर्जेदार क्रिकेटचे सामने गावकऱ्यांना पहावयास मिळत असल्याने गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे .
तांदुळवाडीत TPL चा थरार | thrill of TPL in Tandulwadi
तांदुळवाडीत TPL चा थरार | thrill of TPL in Tandulwadiकोरोनता कोण आपलं होत .....पहा मराठी लघुचित्रपट कहर
मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
0 Comments