BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

युवा चेअरमन | Young Chairman

युवा चेअरमन | Young Chairman


युवा चेअरमन Young Chairman


 

विश्वासराव नाईक साखर कारखाना बरोबरीने विश्वास उदयोग व विराज उदयोग समुह निर्माण करण्याचे काम आमदार मानसिंगराव नाईक यांनी  केले. त्यामुळे त्यांची सहकार सम्राट अशी वेगळी ओळख निर्माण झाली आहे. तेच नेतृव गुण व संघटन कौशल्य आत्मसात करत आपल्या घराण्याची परंपरा पुढे नेण्यासाठी  मा. विरज दादा यांनी  ५ वर्षा पूर्वी राजकारण व समाज कारणामध्ये सकीय सहभाग घेतला. सर्व प्रथम  भाऊंनी त्यांच्यावर विराज उदयोग समुहाची जबाबदारी दिली. ती जबबदारी कमी वयात समर्थपणे सांभाळली. त्यामुळे आज त्याच्या हाती विराज उद्योग समूहाची जबाबदारी देत त्यांना चेअरमन व कार्यकारी संचालक पदाची संधी मिळाली आहे. त्यांची ही निवड आम्हा युवा  कार्यकर्त्यांचा उत्साह व बळ वाढवणारी आहे. 

युवा चेअरमन Young Chairman

युवा चेअरमन Young Chairman

 अधिक माहितीसाठी जाहिरातीवर क्लिक करा

दादांनी आपल्या बुद्धीमत्तेच्या कसोटीवर ही  जबाबदारी लिलया पार पाडतील यात तिळमात्र शंका नाही. ते सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून चांगले काम करत आहेत. त्यामुळे   शिराळा, वाळवा विधानसभा मतदार संघामध्ये एका नव्या नेतृत्वाचा उदय झाला. विराज नाईकदादा हे सुसंस्कृत, उच्च विदयाविभुषीत, शांत व संयमी असलेमूळे युवकांच्या मनामध्ये आदरयुक्त स्थांन त्यांनी निर्माण केले. आपल्या भागाच्या विकासाकामी तालुक्यामध्ये त्यांनी गाववार दौरे करून भौगोलिक परिथितीचा अगदी जवळुन अभ्यास केला आहे. सर्व सामान्य लोकांच्या अनेक समस्यांचे निराकारण पंचायत समिती, तहसिल ऑफिस मधील कामे अगदी सहजपणे पुर्ण करण्याचा दादांनी प्रयत्न केलेला आहे.

युवा चेअरमन Young Chairman

राजकीय दृष्टया युवक नेता म्हणुन  आमदार भाऊंचे नेतृत्व बळकट करण्यासाठी तसेच पक्षीय संघटन मजबुत करण्याकामी गाववार राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या शाखा निर्माण करण्याचे काम  आजही करत आहेत. गेल्या ३ वर्षापुर्वी व याही वर्षी अतीवृष्टीमुळे वारणा व कृष्णा नदयांना आलेल्या महापुरामुळे नदीच्या काठावर असणाऱ्या अनेक गावांचे तसेच शेतकऱ्यांचे प्रचंड नुसकान व हाल झाले. या विपरीत परिस्थीतीमध्ये आपल्या भागाचा दौरा करून लोकांना धीर व आधार देण्याचे काम दादांनी केले. तसेच आमदार भाऊच्या मार्गदर्शनाखाली लोकांना आरोग्य सुविधा जीवनावश्यक वस्तु तसेच संसार उपयोगी साहित्य जनावरांना पशुखादय उपलब्ध करून वाटप करण्याचे काम केले आहे.

युवा चेअरमन Young Chairman

 

२ वर्षा पासुन आलेल्या कोरोना सारख्या वैश्विक महामारीमुळे लोकांचे झालेले हाल पाहुन दादा सतत व्यवस्थित होते. आपण या परथितीमध्ये लोकांना काहीतरी मदत केली पाहिजे असा विचार ते सतत करीत होते. त्याकामी त्यांनी तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उप केंद्र तसेच ग्रामिण जिल्हा उप रुग्नालय येथील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सॅनिटायझर मशिन, सानिटायझर मास्क फेस सिल्ड मास्क, पिपीई किट इ. साहित्याचे वाटप केले. आरोग्य सेविका, तसेच अंगणवाडी सेविका यांना सुदधा गाव स्तरावर या साहित्याचे वाटप केले.

युवा चेअरमन Young Chairman

तालुक्याचे तहसील, पंचायत समिती, पोलिस स्टेशन ऑफिसमधील सर्व कर्मचाऱ्यांना वरील सर्व साहित्य देण्याचा अभिनव उपक्रम दादांनी राबवला आहे. तसेच तालुक्तातील सर्व गावामध्ये ग्रामपंचायत व आरोग्य सेविका यांच्या माध्यमातुन लोकांचे आरोग्य सुरक्षित रहावे या कामी कोरोना या साथीमध्ये अर्सेनिक अल्बम गोळयांचे वाटप गाववार प्रत्येक कुटूंबापर्यंत पोहोच करणेचे महत्वपुर्ण काम करून लोकांना आदर देण्याचे काम केले. 

युवा चेअरमन Young Chairman

 

मधल्या काळामध्ये कोरोनाची लाट कमी झाली असता विराज नाईक दादा यांच्या संकल्पनेतुन महिला सबलिकरण कार्यक्रमाअंतर्गत शिराळा विधानसभा मतदार संघातील सर्वगावामध्ये महिलांना कमी दरामध्ये आटा चक्की वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्याचा फायदा ग्रामीण भागातील महिलांना झाला. आपल्या घरामध्ये आटा चक्की वापरायला शिकण्याचा फायदा ग्रामिण भागातील महिलांना झाला. हा फायदा फक्त दादांच्या नेतृत्वामुळे होऊ शकला.

युवा चेअरमन Young Chairman

वरील सर्व कामांचा व या २ वर्षातील कठीण परिस्थीतीमध्ये दादांनी केलेल्या समाज उपयोगी कामाची दखल घेवुन राज्याचे जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंतरावजी पाटील साहेब व पक्षातील वरीष्ठ मंडळीनी मा. श्री. विराज नाईक दादा यांना सांगली जिल्हा राष्ट्रवादी युवक जिल्हा अध्यक्ष पदी काम करण्याची संधी दिली त्यातुनच खऱ्या अर्थाने विराज नाईक दादा यांचे बहुआयामी नेतृत्व जिल्हाभर पोहचले. जिल्हाअध्यक्ष पदी निवड झालेनंतर दादांनी सर्वच तालुक्यांना भेटी देऊन पक्षीय संघटना मजबूत करणे कामी युवकची तालुका कार्यकारणी करणे कामी प्रयत्न केले. जिल्हयातील सर्वच तालुक्यामध्ये युवकांना वाटणाऱ्या समस्या जाणून घेण्याचे काम दादा करीत असुन जिल्हयातील युवकांच्यासाठी काहीतरी भरीव काम करणेचा दादांचा मानस आहे. २२ सप्टेंबर २०२१ रोजी  दादा यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा केला गेला. त्यावेळी कोरोनाच्या काळात काम करणाऱ्या सर्व यंत्रणेचा कोरोना योद्ध म्हणून सन्मान केला. युवकांना नवी दिशा मिळावी म्हणून युवा उद्योजक या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले. अशा या समाज हित जोपासणाऱ्या युवा नेतृत्वाला सर्व युवा कार्यकर्त्याकडून पुढील वाटचालीस शुभेच्छा. 

सागर नलवडे (वीर कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स शिराळा)

 

युवा चेअरमन Young Chairman

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

 

या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

 यावेळी पाटील म्हणाले,  सलग सात  दिवस शुक्रवार,शनिवार,रविवारी,सोमवार,मंगळवार , बुधवार आणि आज  गुरुवारी  तालुक्यातील  कोणत्याही गावात  कोरोनाचा रुग्ण सापडला नाही.

या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            


Post a Comment

0 Comments