〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓
हे ही वाचा-सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक भाजप व महाविकास आघाडीचे असे आहे पॅनेल
〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓
औरंगाबाद येथे झालेल्या सरपंच परिषदमध्ये जाहीर सभेत आमदार संजय शिरसाट यांनी ग्रामसेवकांच्याबद्दल बेजबाबदार,बेताल व अशोभनीय केलेल्या वक्त्यव्याचा शिराळा ग्रामसेवक युनियनच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात आला.
त्या वक्तव्याच्या निषेधार्थ एक दिवसीय लाक्षणिक काम बंद आंदोलना करण्यात आले.यावेळी संघटनेचे अध्यक्ष एम. एन. पाटील म्हणाले,ग्रामसेवक राज्य, केंद्र शासनाच्या सर्व लोककल्याणकारी योजनाची ग्रामस्तरावर प्रभावी अंमलबजावणी करत असतात. गाव पातळीवर बऱ्याच अडचणी व कमतरता असतानाही गावच्या विकासासाठी कित्येक योजनाचा लाभ वंचित घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अत्यंत प्रामाणिक काम केले आहे.
त्यामुळेच केंद्र शासनाच्या उत्कृष्ठ ग्रामविकास विभागाचे पारितोषिक कित्येक वेळा महाराष्ट्र ग्रामविकास विभागाने मिळवले आहे. याबाबत कोणतीही माहिती न घेता, निव्वळ संवग प्रसिद्धीसाठी आमदार संजय शिरसाट यांनी जाहीर सभेत राज्यातील सर्व ग्रामसेवक यांच्याबद्दल अत्यंत बेजबाबदार, बेताल, व खालच्या पातळीवरील वक्त्व्य केले आहे. त्यांच्या या अर्थहीन वक्त्यव्याचा महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन (डी एन ई १३६) निषेध करत आहे. आमदार शिरसाट यांनी सर्व ग्रामसेवकांची जाहीर माफी न मागितलेस तीव्र काम बंद आंदोलन करणार.
यावेळी हिंदुराव पाटील, प्रसाद पाटील, शिवाजी पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पंचायत समितीचे विस्तार अधिकारी नानासाहेब कारंडे यांनी आंदोलनास पाठींबा दिला.
हे ही वाचा-सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक अपडेट
〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓
यावेळी तालुका संघटनेचे उपाध्यक्ष संतोष साठे, सचिव अरुण रेळेकर, ग्रामसेवक संघांचे तालुका अध्यक्ष महेश भोई, उपाध्यक्ष दिलीप डवरी, सचिव अमोल कुंभार, राज्य कार्यकारिणी चे पुणे विभागीय सचिव आर. डी. पाटील, राज्य कार्यकारिणी महिला संघटक शुभांगी मस्के, जिल्हा संघटना महिला उपाध्यक्ष रुपाली पाटील, तालुका सदस्य मंगेश पाटील, योगेश नाईक, वंदना खोत, तज्ञ् संचालक आर. बी. पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन संदीप खैर यांनी केले.
माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी
कोरोनता कोण आपलं होत .....पहा मराठी लघुचित्रपट कहर
मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
0 Comments