BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

ऐरणीचा घाव पोटावर पडतो तेंव्हा | When Airani's wound falls on his stomach

ऐरणीचा घाव पोटावर पडतो तेंव्हा | When Airani's wound falls on his stomach

ऐरणीचा घाव पोटावर पडतो तेंव्हा | When Airani's wound falls on his stomach

सध्या सर्वत्र सुगीचे दिवस चालू असल्याने खेडेगावात औजारे बनवणारे गाडी लोहार  गावागावात तळ ठोकून आहेत. ग्रामीण भागात शेतीसाठी लागणारी अवजारे पुरवण्याचे एक घटक म्हणजे हेच लोहार व घिसाडी कारागीर असतात. 

     ज्या गावांमध्ये लोहार कारागीर नाहीत अशा गावांमध्ये हे गाडीलोहार आपला मुक्काम तळ ठोकून  त्या गावातील शेतीला लागणारे अवजारे बनवून देण्याचे काम करत असतात.   गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्यामुळे या कारागीरांच्या हाताला काम मिळत नव्हते. सध्या पाऊस  चांगला झाल्याने व कोरोनाचे संकट हळूहळू  दूर होत असल्याने सर्व व्यवहार पूर्ववत सुरू झाले आहेत. मात्र या कारागीरांच्या हाताला पहिल्या सारखे काम मिळत नाही.

ऐरणीचा घाव पोटावर पडतो तेंव्हा | When Airani's wound falls on his stomach

   कारण शेतीसाठी लागणारे अवजारांचे कारखाने उभे राहिले. या कारखान्यातून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जात आहे. कारखान्यात तयार झालेली अवजारे थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचू लागली आहेत.त्यामुळे पारंपारिक पद्धतीने तसेच जुन्या तंत्रज्ञानाच्या जोरावर काम करणारे लोहार व घिसाडी कारागिरांच्या व्यवसायावर गंडांतर आले आहे. कारखान्यात तयार झालेली अवजारे घेण्याची ज्या शेतकऱ्यांची आर्थिक ताकद नाही, असे शेतकरी आजही लोहार कारागिरांकडून अवजारे तयार करून घेत आहेत.       

ऐरणीचा घाव पोटावर पडतो तेंव्हा | When Airani's wound falls on his stomach 

    शेताची मेहनत करून घेत असताना शेतकरी वापरत असलेल्या कुळवाचे फास, लाकडी बैलगाडीच्या धावा, विळा, खुरपे, कुऱ्हाड, कोयता बनवणे,त्यांना धार लावणे,  मजूर लोकांना लागणारी खोरी, पार, टिकाव, साहित्य शेवटने याशिवाय घरी वापरात येणारी काठवट, रवी, उलथणे, पक्कड या वस्तूंचे ही उत्पादन हे बारा बलुतेदार कारागीर करीत असतात.

ऐरणीचा घाव पोटावर पडतो तेंव्हा | When Airani's wound falls on his stomach

   या सगळ्या संसार उपयोगी साहित्य यांचेही आता उत्पादन कारखान्यात मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने या लोहार कारागीरांकडे लोकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे बेकारी वाढू लागल्याने एक प्रकारे राबणाऱ्या कारागीरांच्या पोटावरच एक प्रकारे ऐरणीचे घाव पडू लागला आहे.

        ऐरणीचा घाव पोटावर पडतो तेंव्हा | When Airani's wound falls on his stomach

 प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

Post a Comment

0 Comments