शिराळा : ग्रामीण भागातील महिलांच्यासाठी स्वतंत्र उद्योग उभारण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे प्रतिपादन विराज ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष विराज नाईक यांनी केले.
येथील विराज ग्रुप ऑफ इंडस्ट्रिजच्या अध्यक्ष व कार्यकारी संचालकपदी निवड झाल्याबद्दल इंडस्ट्रिज मधील अधिकारी व कर्मचाऱ्यामार्फत आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार मानसिंगराव नाईक होते.
यावेळी नाईक म्हणाले, शेतीचे उत्पन्न घेत असलेल्या या शेतात आजोबा फत्तेसिंगराव नाईक आप्पा यांनी लोकांच्या हाताला काम मिळावे अशा उद्योगाची उभारणी व्हावे हे स्वप्न पहिले. त्यांचे हे स्वप्न आमदार मानसिंगराव नाईक यांनी विराज उद्योग समूहाच्या माध्यमातून विविध कारखाने उभा करत सक्षमपणे चालवून पूर्ण केले. या विराज उद्योग समूहाची असणारी विकासची घोडदौड यापुढे कायम ठेवण्याचा मी प्रयत्न करेन. ग्रामीण भागात चालणारे विविध उद्योग उभारणीसाठी प्रयत्न सुरु आहेत.
प्रारंभी सरव्यवस्थापक युवराज गायकवाड व सर्व कर्मचारी यांच्यावतीने विराज ग्रुप ऑफ इंडस्ट्रिजच्या अध्यक्ष व कार्यकारी संचालकपदी निवड झाल्याबद्दल विराज नाईक व संचालकपदी निवड झाल्याबद्दल डॉ. शिमोनी नाईक यांचा सत्कार करण्यात आला.
स्वागत व प्रास्ताविक सरव्यवस्थापक युवराज गायकवाड यांनी केले. यावेळी आमदार मानसिंगराव नाईक, आपला बझार समुहाच्या अध्यक्षा सौ. सुनितादेवी नाईक, डॉ. शिमोनी नाईक ,समाधान दूध संघ वडगावचे अध्यक्ष राहूल थोरात, माजी जिल्हापरिषद सदस्य महदेव कदम , अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आभार उदय पाटील यांनी मानले.
अधिक माहिती साठी 👇जाहिरातीव क्लिक करा
मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"
चेअरमनपदाने कार्यकर्तुत्वाचा सन्मान | Honors for working as chairman
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
0 Comments