शिराळा: स्वातंत्र्य लढ्यातील प्रेरणा कायम जागवण्यासाठी राज्यस्तरीय हुतात्मा स्मारक उभारणार आहे, असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.
हे ही वाचा -कोकेन प्रकरणी टांझानियाचा तरूण वाघवाडी फाटा येथे पोलिसांच्या ताब्यात
बिळाशी (ता. शिराळा) महसूल विभागामार्फत स्वातंत्र्याच्या अमृतहोत्सवा निमित्त तालुक्यातील सर्व हुतात्मा स्मारकांची स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यानिमित्त बिळाशी येथील हुतात्मा स्मारक व परिसर स्वच्छता करण्यात आली. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सत्यजीत देशमुख, प्रांताधिकारी ओंकार देशमुख, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी संतोष राऊत प्रमुख उपस्थित होते.
आमदार नाईक म्हणाले, राज्यातील संपूर्ण स्वातंत्र्य सैनिकांचे बिळाशी येथे भव्य राष्ट्रीय स्मारक होईल. या स्मारकासाठी पाठपुरावा करणार आहे. हे स्मारक झाल्यानंतर ते आगामी पिढ्यांना स्वातंत्र्य संग्रामाची आठवण व प्रेरणा देत राहील. स्वातंत्र्य संग्रामात बिळाशीचा मोठा वाटा आहे.
संचालक देशमुख म्हणाले, स्वातंत्र्य संग्रामात देशामध्ये सर्वात मोठे जे चार उठाव झाले, त्यापैकी एक उठाव बिळशीच्या बंडाच्या रुपाने झाला होता. इतिहासाच्या पायावर भविष्याची उभारणी होत असते. पुढच्या पिढ्यांना त्यातुन प्रेरणा मिळत राहते. आमदार मानसिंगभाऊंनी येथे राष्ट्रीय स्मारकाचा संकल्व केला असून तो लवकरात लवकर पूर्ण करावा.
प्रारंभी स्वागत माजी सभापती आनंदराव पाटील यांनी केले. हुतात्मा स्तंभाला स्वातंत्र्य सैनिक महिलांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पन केले. प्रास्ताविक ग्रामीण कथाकार बाबा परिट यांनी केले. स्वातंत्र्य सैनिक महिलांचा सन्मान करण्यात आला. तहसीलदार गणेश शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानदेव वाघ, जिल्हा परिषद सदस्य संपतराव देशमुख, विश्वासचे संचालक विष्णू पाटील, नाईक दुध संघाचे उपाध्यक्ष प्रकाश धस आदींचा सहभाग होता. कार्यक्रमास पी. आर. पोतदार, माजी सभापती आनंदराव पाटील,
बाजार समितीचे सभापती सुजीत देशमुख, सरपंच सौ. कल्पना यमगर, उपसरपंच दत्तात्रय मगदुम, विजय रोकडे, विकास पांढरे, चंद्रकांत साळुंखे, विश्वास महादेव पाटील, बाजीराव पाटील, बाबासाहेब परिट, डॉ. दिनकर झाडे, दिलीप कुंभार, स्वातंत्र्य सैनिक हिराबाई गोविंद पाटील, इंदूबाई दत्तात्रय लोहार, कमळाबाई रामचंद्र लोहार, डॉ. के. जी. माळी, दिलीप भोगावकर, संग्राम लोहार, संतोष पाटील, रामचंद्र सातपुते आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. सुत्रसंचालन विजय रोकडे यांनी केले. आभार दूध संघाचे संचालक एस. वाय. यमगर यांनी मानले.
मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"
कोरोनता कोण आपलं होत .....पहा मराठी लघुचित्रपट कहर
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
0 Comments