शिराळा: कोल्हापूर व सांगली जिल्हा जोडणाऱ्या वारणा नदीवरील मांगले -काखे पुलाचे रखडलेले काम येत्या ३० नोव्हेंबर पूर्वी सुरू न झाल्यास १ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता काम बंद असलेल्या वारणा नदीवरील पुलाजवळ जलसमाधी आंदोलन कऱण्याचा इशारा मांगले (ता शिराळा) येथील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे तहसीलदार गणेश शिंदे यांना दिला आहे.
कोल्हापूर, सांगली व सातारा हे तीन जिल्हे जोडणारा वारणा नदीवरील मांगले- काखे पूलाचे केंद्रीय रिझर्व्ह फडातून काम सुरू आहे .बालाजी कन्स्ट्रक्शन बेळगाव यांनी गतवर्षी २२ सप्टेंबर २०२० रोजी पुलाचे काम सुरू केले. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांनी पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करून देण्याचे आश्वासन देऊन दोन्ही तीरावरील ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले त्यामुळे नियम असतानाही पर्यायी रस्ता तयार केला नाही.
ठेकेदाराने उन्हाळ्यात काम झपाट्याने केले. मात्र मांगले गावाकडील एका पिलरचे काम वारणा नदीतील पाण्यामुळे करता आले नाही. वारणा नदी दूधडी भरून असल्याने ठेकेदाराने अनेक प्रयत्न करूनही यश आले नाही. शेवटी पावसाळ्यात ७ जूनला काम ठप्प झाले ते आजपर्यंत त्यावर कोणतीही हालचाल नाही. पावसाळ्यापूर्वी आमदार डॉ विनय कोरे यांनी पुलावर प्रत्यक्ष भेट देऊन सार्वजनिक बांधकाम अधिकारी व ठेकेदार यांना दिवाळीपूर्वी काम सुरु करण्याचे आदेश दिले होते. तरिही काम सुरू न केल्याने काखे व मांगले सह परिसरातील ८-१० गावात असंतोष पसरला आहे.
गेल्या महिन्याभरापासून वारणा साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाल्याने लांब, अरुंद चिकुर्डे मार्गावरून जीवघेणी वाहतूक सुरू आहे. या काळात लहान मोठे अपघात झाले असून चिकुर्डे गावात सतत वाहतुकीची कोंडी होत असल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. मांगले व परिसरातील विद्यार्थी मोठया प्रमाणात कोल्हापूर, वारणानगर व पेठवडगाव या ठिकाणी शिक्षणासाठी येत असल्याने वेळेत पोहचत नसल्याने शैक्षणीक नुकसान सुरू आहे. कोल्हापूर व वारणानगर, एमआयडीसी मध्ये येणारे कर्मचारी व पन्हाळा व हातकणंगले तालुक्यातील नागरिक शिराळा तालुक्यात जाताना जीव मुठीत घेऊन आर्थिक भुर्दंड सोसत प्रवास करीत आहेत.
त्यामुळे शासन व ठेकेदाराने काम त्वरित सुरू करावे या मागणीसाठी मांगले ग्रामस्थ आक्रमक झाले असून येत्या ३० नोव्हेंबर पर्यन्त कामास सुरूवात झालीं नाही तर बुधवार १ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता काम बंद असलेल्या पुलाजवळ वारणा नदीत जलसमाधी घेण्याचा इशारा मांगले गावातील शंभराहून अधिक ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे. अशा आश्याचे निवेदन शिराळा तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस ठाणे यांना भेटून दिले आहे.
माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी
मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"
कोरोनता कोण आपलं होत .....पहा मराठी लघुचित्रपट कहर
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
0 Comments