भूकंप यंत्रणेलाच अपुरे कर्मचारी व कालबाह्य इमारतीचा धोका |Inadequate staffing for seismic systems and the risk of outdated buildings
भूकंप यंत्रणेलाच अपुरे कर्मचारी व कालबाह्य इमारतीचा धोका |Inadequate staffing for seismic systems and the risk of outdated buildings
वारणावती (ता. शिराळा) येथे असणारी भूकंपमापन यंत्रणा कालबाह्य झाल्याने येथील भूकंपाच्या नोंदी ह्या रामभरोशे झाल्या आहेत.कोकरूड येथील भूकंपमापन यंत्रणा बंद असल्याने भूकंपाचा केंद्र बिंदू कोणत्या दिशेला होता याचा अंदाज बंधने यंत्रणेला अवघड जाता आहे, शिराळा तालुक्यात वारणावती व कोकरूड येथे भूकंप मापन केंद आहे. भूकंप झाल्यास दोन्ही ठिकाणच्या नोंदीवरून त्याची तीव्रता व केंद्र बिंदू कळत होता. सध्या एकच भूकंप मापन यंत्र सुरु असल्याने नोंदीला अडचण येत आहे.
भूकंप यंत्रणेलाच अपुरे कर्मचारी व कालबाह्य इमारतीचा धोका |Inadequate staffing for seismic systems and the risk of outdated buildings
वारणावती येथे भूकंपाच्या नोंदी घेण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारीच नाही. येथे असणारे एक प्रशिक्षित कर्मचारी गेल्या चार वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागी दुसरा प्रशिक्षित कर्मचारी नेमण्यात आलेला नाही. भूकंप झाला की उपस्थित अन्य कर्मचारी, चौकीदार यांच्यामार्फत या नोंदी घेतल्या जातात. त्यामुळे अचूक नोंदी बाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
भूकंप यंत्रणेलाच अपुरे कर्मचारी व कालबाह्य इमारतीचा धोका |Inadequate staffing for seismic systems and the risk of outdated buildings
चांदोली परिसर हा भूकंप प्रवण क्षेत्र आहे. चांदोली धरणाच्या बांधकामापासून वारंवार होणाऱ्या भूकंपाचा केंद्रबिंदू वारणावती चांदोली परिसरातच आहे. या भूकंपाची नोंद घेता यावी म्हणून शासनाने तीस वर्षांपूर्वी वारणावती येथे भूकंपमापन केंद्राची उभारणी केली.मात्र अपुरे कर्मचारी, नादुरुस्त इमारत, आणि कालबाह्य यंत्रणा यामुळे या केंद्राची दुरवस्था झाली आहे.
भूकंप यंत्रणेलाच अपुरे कर्मचारी व कालबाह्य इमारतीचा धोका |Inadequate staffing for seismic systems and the risk of outdated buildings
वारणा प्रकल्पांतर्गत वारणावती कोकरूड, मराठवाडी (ता. पाटण) चिखली (ता. संगमेश्वर) व साखरपा (ता. संगमेश्वर) या पाच ठिकाणी भूकंप मापन केंद्रे आहेत. भूकंप झाला की या सर्व केंद्रातील नोंदी विचारात घेऊन धक्क्याची तीव्रता निश्चित केली जाते.मात्र या केंद्राकडे गेल्या अनेक वर्षापासून दुर्लक्ष झाले आहे. यातील काही केंद्रे बंद अवस्थेत आहेत.तर दुसरीकडे अप्रशिक्षित व अपुरे कर्मचारी यामुळे भूकंपाच्या नोंदी घेण्यात अडचणी होत आहेत.
भूकंप यंत्रणेलाच अपुरे कर्मचारी व कालबाह्य इमारतीचा धोका |Inadequate staffing for seismic systems and the risk of outdated buildings
गेल्या महिन्यात दुपारच्या सुमारास चांदोली परिसराला सौम्य स्वरूपाचा धक्का जाणवला होता. हा धक्का बराच वेळ असल्यामुळे परिसरात तो अधिक प्रमाणात जाणवला. त्यामुळे याची तीव्रता नक्कीच साडेतीन ते चार रिश्टर स्केल च्या दरम्यान असावी असा अंदाज नागरिकांनी बांधला होता. मात्र त्याची नोंद वारणावती येथील भूकंपमापन केंद्रांमध्ये 2.8 रिश्टर अशी अति सौम्य नोंदवली गेली. याच धक्क्याची नोंद कोयना परिसरात मात्र 3.8 रिश्टर स्केल इतकी नोंदली गेली. या पूर्वीचा इतिहास पाहता कोयना व चांदोली परिसरात बसलेल्या भूकंपाची तीव्रता एखाद्या दुसऱ्या पॉइंट् चा फरक सोडला तर तितक्याच क्षमतेचा असतो. हा धक्का मात्र तब्बल 1 रिश्टर ने कमी नोंदला गेला. कालबाह्य यंत्रणा आणि अप्रशिक्षित कर्मचारी याचा हा परिणाम अधोरेखित झाला.
भूकंप यंत्रणेलाच अपुरे कर्मचारी व कालबाह्य इमारतीचा धोका |Inadequate staffing for seismic systems and the risk of outdated buildings
नियमानुसार भूकंप मापन केंद्रात किमान चार ते पाच कर्मचारी आवश्यक आहेत. वारणावती येथे मात्र एका अप्रशिक्षित चौकीदारावर या केंद्राची जबाबदारी टाकण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यावर ही केंद्राबरोबरच इतर कामाची जबाबदारी असल्यामुळे भूकंप झाल्यानंतरच हा कर्मचारी केंद्रात येतो. बहुतांशी वेळा प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींन मार्फत भूकंप झाला आहे हे अधिकाऱ्यांना कळते. त्यानंतर अधिकाऱ्यांमार्फत संबंधित कर्मचाऱ्याला केंद्रावर पाठवून नोंद घेतली जाते.
भूकंप यंत्रणेलाच अपुरे कर्मचारी व कालबाह्य इमारतीचा धोका |Inadequate staffing for seismic systems and the risk of outdated buildings
चांदोली परिसरात तीस वर्षात पंचवीस हजाराहून अधिक भूकंप धक्क्यांची नोंद झाली आहे. त्यापैकी शेकडो धक्के जाणवले आहेत. मध्यम स्वरूपाचे अनेक धक्के बसले आहेत. अशी परिस्थिती असतानाही येथील भूकंपमापन केंद्र व येथील यंत्रणा कालबाह्य आहे. शासनाने येथे अत्याधुनिक यंत्रणा प्रशिक्षित कर्मचारी देऊन हे भूकंपमापन केंद्र सुसज्ज करण्याची गरज आहे.
भूकंप यंत्रणेलाच अपुरे कर्मचारी व कालबाह्य इमारतीचा धोका |Inadequate staffing for seismic systems and the risk of outdated buildings
माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी
मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"
कोरोनता कोण आपलं होत .....पहा मराठी लघुचित्रपट कहर
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
0 Comments