चेअरमनपदाने कार्यकर्तुत्वाचा सन्मान | Honors for working as chairman
चेअरमनपदाने कार्यकर्तुत्वाचा सन्मान | Honors for working as chairman
चेअरमनपदाने कार्यकर्तुत्वाचा सन्मान | Honors for working as chairman
२१ वर्षच्या तपश्चर्येने शिराळच्या नागभूमीत गोरक्षनाथांच्या पदस्पर्शाने, जोतिबाच्या आशीर्वादाने व आमदार मानसिंगराव नाईक यांच्या मार्गदर्शनाने विराज उद्योग समूह विकासाच्या दिशेने झेपावला आहे. अशाच या विराज उद्योग समूहाच्या अध्यक्ष व कार्यकारी संचालकपदी विराज नाईक यांची झालेली निवड ही या उद्योग समूहाला आणखी बळ देईल.त्यांच्या या निवडीबद्दल आज होणाऱ्या सत्कार समारंभ निमित्ताने....
चेअरमनपदाने कार्यकर्तुत्वाचा सन्मान | Honors for working as chairman
सन २००० साली आमदार मानसिंगराव नाईक यांनी विश्वास कारखान्याची सूत्र हाती घेतली. तालुक्यातील ऊसाचे क्षेत्र वाढले पाहिजे हा उदात्त हेतून समोर ठेवून नवीन उपसा जलसिंचन योजना सुरू केल्या. शेतकऱ्यांना चांगला दर देता यावा म्हणून डिस्टीलरी प्रकल्पाची उभारणी करून उपपदार्थ निर्मितीवर भर दिला. त्यानंतर सहवीज निर्मिती प्रकल्पाची उभारणी करून कारखान्याला आर्थिक पाठबळ दिले. भाऊंनी उभारलेले सर्वच प्रकल्प यशस्वीपणे व पूर्ण क्षमतेने सुरू आहेत.
चेअरमनपदाने कार्यकर्तुत्वाचा सन्मान | Honors for working as chairman
या उद्योग समूहातील प्रत्येक प्रकल्पाचे असणारे धोरणात्मक निर्णय हे शेतकरी व सर्वसामान्य लोकांच्या हिताचे असले पाहिजेत यासाठी लागणारे सर्व बारकावे आमदार नाईक यांच्याकडून विराज नाईक यांनी शिक्षण सुरू असताना कमी वयात आत्मसात केले. विराज यांच्याकडे असणारी निर्णय व निरीक्षण क्षमता आमदार मानसिंगराव नाईक यांनी हेरून उच्च शिक्षण घेत असताना त्याच्यावर विराज उद्योग समूहाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी दिली. ती त्यांनी यशस्वीपणे सांभाळली.
विराज नाईक यांनी विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर लंडन येथे नॉटिंगहँम युनिव्हर्सिटी लंडन मधून बिझनेस मॅनेजमेंटची पदवी प्राप्त केली आहे.
चेअरमनपदाने कार्यकर्तुत्वाचा सन्मान | Honors for working as chairman
त्यांच्याकडे असणारे संघटन कौशल्य पाहून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी विराज नाईक यांना सांगली जिल्हा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली. त्यातून त्यांनी संपूर्ण जिल्हाभर आपले जाळे निर्माण केले आहे. एक यशस्वी उद्योजक ते कुशल संघटक ही त्यांची वाटचाल सुरू झाली आहे.
या सर्व प्रगतीचा मागील २१ वर्षाचा मी साक्षीदार आहे. विश्वासच्या डिस्टीलरी उभारणीसाठी २००० मध्ये मला भाऊंनी मला कामाची संधी दिली.त्यावेळे पासून आज पर्यंत २१ वर्षात विश्वास डिस्टीलरी, विराज अल्कोहोल, विराज कॅटल फिड्स,विराज रिफयनरी,विराज हायटेक,सी.ओटू प्रकल्प व इतर उपपदार्थ प्रकल्प उभारणीमध्ये मला खारीचा वाटा उचलण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य समजतो.
चेअरमनपदाने कार्यकर्तुत्वाचा सन्मान | Honors for working as chairman
आज दीपावलीच्या मुहूर्तावर नाईक यांच्या निवडीबद्दल त्यांचा विराज इंडस्ट्रीज कार्यस्थळावर सर्व कर्मचारी यांच्यावतीने सत्कार होत आहे. आमदार मानसिंगराव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली विराज यांच्या नेतृत्वाखाली या उद्योग समूहाची आणखी भरभराट होईल यात शंका नाही.त्यांच्या पुढील कार्यासाठी सर्व अधिकार व कर्मचारी यांच्याकडून हार्दीक शुभेच्छा.
युवराज गायकवाड जनरल मॅनेजर विराज ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज शिराळा
सोडवा शिव सामान्यज्ञान भाग ६
मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
0 Comments