BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

आई वडिलांचे छत्र हरपलेल्या दिव्यांग सुरेखाला प्रतीक्षा उपचाराच्या भाऊबीजेची | Divyang Surekha, who lost her parents' is waiting for treatment

 आई वडिलांचे | छत्र हरपलेल्या | दिव्यांग | सुरेखाला | प्रतीक्षा उपचाराच्या | भाऊबीजेची  | Divyang | Surekha, | who lost her parents'|  is waiting for treatment |

आई वडिलांचे | छत्र हरपलेल्या | दिव्यांग | सुरेखाला | प्रतीक्षा उपचाराच्या | भाऊबीजेची  | Divyang | Surekha, | who lost her parents'|  is waiting for treatment |  

वडिलांचे छत्र हरवले असताना जगण्याचा आधार असणारी माता ही पंधरा दिवसांपूर्वी काळाच्या पडद्याआड गेली. असताना अपंगत्वावर मात करत जगण्याचा संघर्ष करणाऱ्या सुरेखा वायदंडे यांचे हे ही जगणं कदाचित नियतीला मान्य नसावे. चार दिवसापूर्वी त्यांना ह्रदय विकाराचा तीव्र धक्का बसला.आधीच लुळ पांघळ असणारे शरीर आता उपचारासाठी अंथरुणावर खिळून आहे. या अंथरुणावर खिळून असणाऱ्या सुरेखा यांना औषधोपचारातून जगण्याला आणखी बळ मिळण्यासाठी मदतीचा हात हवा आहे. ऐन दिवाळीत त्यांना प्रतीक्षा  आहे उपचाराच्या भाऊबीजेची. 

आई वडिलांचे | छत्र हरपलेल्या | दिव्यांग | सुरेखाला | प्रतीक्षा उपचाराच्या | भाऊबीजेची  | Divyang | Surekha, | who lost her parents'|  is waiting for treatment |

ही हृदयद्रावक कहाणी आहे चिखली (ता.शिराळा) येथील कै.गुंगा वायदंडे नामांकित व समाज्याशी आपला कुटुंबीक जिव्हाळा निर्माण करणाऱ्या शिक्षकाच्या अपंग मुलीची.सुमारे ४० वर्षा पूर्वी गुंगा गुरुजींचे चिखली गावात आगमन झाले. त्यांना परिसरात खूप मान सन्मान मिळाला.नाईक कुटुंबातील अनेक जण त्यांचे विद्यार्थी. विशेष म्हणजे विश्वास कारखान्याच्या महत्वाच्या कागदपत्रांचे लिखाण ही त्यांनी केले.त्यांना तीन मुली आणि एक मुलगा. त्या पैकी दोन मुली विवाहित आहेत. तिसरी सुरेखा या जन्मताच अपंग असल्याने त्यांचे लग्न झाले नाही. त्यांचा मुलगा मिरज येथे स्थायिक होऊन भू विकास बँकेमध्ये नोकरीसाठी होता परंतु ती बँक अडचणीत आली आणि नोकरीं गेली. गुरुजींचे निधन झाले तेव्हा सरपंच राजेंद्र नाईक यांनी त्यांचा अंत्यविधी चिखलीतच व्हायला पाहिजे असा आग्रह करून दफनविधीसाठी जागा दिली.त्यांच्या निधना नंतर सुरेखा आईसोबत चिखली येथे राहत होत्या.

सोडवा शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६ 

आई वडिलांचे | छत्र हरपलेल्या | दिव्यांग | सुरेखाला | प्रतीक्षा उपचाराच्या | भाऊबीजेची  | Divyang | Surekha, | who lost her parents'|  is waiting for treatment |

पंधरा दिवसा पूर्वी आईचे निधन झाले आहे. आई वडिलांचे छत्र हरपल्याने खचून न जाता जीवनाचा संघर्ष करणाऱ्या सुरेखा याना दुर्दैवाने चार दिवसापूर्वी ह्रदय विकाराचा तीव्र धक्का बसला. सध्य इस्लामपूर येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

त्या दोन्ही पायानी अपंग असून ही मराठी विषयातून एम. ए. झाल्या आहेत.अपंगत्वावर मात करत त्या दहा ते बारा बचत गटाचे काम पहातात.त्यांनी अनेक अपंग लोकांना शासनाच्या सुविधा मिळवून दिल्या आहेत. पण दुर्दैवाने आता त्यांच्यावरच संकटाचा डोंगर कोसळला आहे. सध्या त्यांना दवाखान्याचे बिल भरणे ही मुश्किल झाले आहे. सध्या दिवाळी सण असल्याने अनेकजण ती मोठ्या दिमाखात साजरी करतात.मात्र सामाजिक भान ठेवून त्यातील थोडा खर्च सुरेखा याना उपचारासाठी दिला तर तिचा जीव वाचेल.खऱ्या अर्थाने भाऊबीजला एका बहिणीला तिचा जीव भेट दिल्याचा वेगळा आनंद लुटता येईल.साठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन सुरेखा याना आर्थिक मदत करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क-  ९५५२५७१४९३ 

आई वडिलांचे | छत्र हरपलेल्या | दिव्यांग | सुरेखाला | प्रतीक्षा उपचाराच्या | भाऊबीजेची  | Divyang | Surekha, | who lost her parents'|  is waiting for treatment |

अधिक माहितीसाठी संपर्क-  ९५५२५७१४९३  

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

Post a Comment

0 Comments