भारत मदने बलभीम केसरीसह एक लाखाचा मानकरी | Bharat Madane Balbhim Kesari with one lakh RS
〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓
हे ही वाचा-सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक भाजप व महाविकास आघाडीचे असे आहे पॅनेल
〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓
भारत मदने बलभीम केसरीसह एक लाखाचा मानकरी | Bharat Madane Balbhim Kesari with one lakh RS
रहीम पठाण / वाळवा
वाळवा तालुक्यातील बोरगाव येथील श्री बलभीम यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकासाठी भारत मदने विरुद्ध गणेश जगताप याच्यात झालेल्या अटीतटीच्या लढतीत जगताप यावर उलटी डाव मारून भारत मदने याने चटकदार कुस्ती करून कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. बलभीम केसरी सह १ लाखाच्या इनामाचा मानकरी ठरला. या मैदानात १०० हुन अधिक चटकदार कुस्त्या झाल्या.
हे ही वाचा -आमदारांनी माफी मागावी अन्यथा काम बंद
द्वितीय क्रमांकासाठी संतोष सुतार विरुद्ध राजेंद्र सुळ या लढतीत सुतार याने गुणावर विजयी मिळवत बोरगाव केसरीसह ७५ हजाराचा मानकरी ठरला. अरुण बोगांर्डे विरुद्ध प्रशांत शिंदे यांच्या झालेल्या चटकदार कुस्तीत बोगांर्डे याने विजय मिळवत कृष्णाई केसरी किताबासह ५१ हजाराचा मानकरी ठरला ही तिसऱ्या क्रमांकाची लढत लक्षवेदी ठरली. बोरगावचा मल्ल शंभूराज पाटील याने शाहरूख मुलाणी याला चितपट करून शौकिनांची वाहवा मिळवली.
भारत मदने बलभीम केसरीसह एक लाखाचा मानकरी | Bharat Madane Balbhim Kesari with one lakh RS
कुस्ती मैदानाची लक्षवेधी लढती अशा- कृष्णा गवळी विजय विरुद्ध राहुल पाटील, रवी चव्हाण वि.वि रोहित खाडे, अंकुश माने वि.वि. बालाजी मेटकरी, प्रवीण पाटील वि.वि. विजय कांबळे, विजय डोईफोडे वि.वि. बाजीराव माने, भारत पवार वि.वि. शुभम लोखंडे, अनिकेत खोत वि.वि. रणविर चौगुले, स्वराज जामखेड वि.वि. शुभम पाटील, सुरज पाटील वि.वि. सनी मदने, तेजस कदम वि.वि. चैतन्य माने, जोतिराम पाटील वि.वि. विश्वजीत पाटील, धीरज पाटील वि.वि. रोहित कारंडे, रोहित सावंत वि.वि. बाला इनामदार, वैभव पाटील वि.वि. प्रदीप वाघमारे, योगेश जाधव वि.वि. आनंदा शिंदे.
भारत मदने बलभीम केसरीसह एक लाखाचा मानकरी | Bharat Madane Balbhim Kesari with one lakh RS
उपसरपंच शकील मुल्ला व यात्रा कमिटीच्या वतीने आखाड्याचे पूजन झाले. सुरुवातीला १०० रुपये इनामापासून कुस्ती मैदानाला सुरुवात झाली सायंकाळी ७ वाजता एक लाख रुपये इनाम व बलभीम केसरी किताबासाठी प्रथम क्रमांकाची कुस्ती यात्रा कमिटीच्या हस्ते जोडण्यात आली या मैदानास आमदार विक्रम सावंत, जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पाटील, महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम, डबल महाराष्ट्र केसरी पै चंद्रहार पाटील, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष विजय पाटील, राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा.शामराव पाटील, राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील, कृष्णा कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, दयानंद पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष संजय पाटील, हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष गौरव नायकवडी, संपत जाधव चिंचोलीकर यांच्यासह कुस्ती क्षेत्रासह अनेक मान्यवरांनी या मैदानाला भेट दिली.
या मैदानात बाळू मांजर्डेकर, तानाजी खरात, विजय पाटील, अनिल बाबर, राजारामबापू कुस्ती केंद्रचे प्रशिक्षक नितीन सलगर यांनी पंच म्हणून काम पाहिले. ईश्वरा पाटील व जोतिराम वाजे यांच्या पहाडी आवाजात कुस्ती मैदानाचे समालोचन करण्यात आले.
भारत मदने बलभीम केसरीसह एक लाखाचा मानकरी | Bharat Madane Balbhim Kesari with one lakh RS
या कुस्ती मैदानाचे संयोजन उपसरपंच शकील मुल्ला, राजारामबापू बँकेचे संचालक माणिक शा. पाटील, कारखान्याचे संचालक कार्तिक पाटील, माजी सरपंच पै.विनायकराव पाटील, प्रकाश वाटेगावकर, माजी उपसरपंच पै विकासराव पाटील, उपसरपंच प्रमोद शिंदे, आशिष शिंदे, सूर्यकांत पाटील, संजय पाटील, पै विलासराव शिंदे, सुधीर पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष रणधीर पाटील, सुनील पाटील, झुंझार पाटील, विकास सूर्यवंशी, प्रा के बी पाटील, मालोजी पाटील, युवराज कांबळे, सुधीर फार्णे,अमर पाटील, सचिन पाटील, प्रदीप पाटील, रामराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य सचिन देसाई, सागर पाटील, जयकर फार्णे, विजय शिंदे यांनी केले.
भारत मदने बलभीम केसरीसह एक लाखाचा मानकरी | Bharat Madane Balbhim Kesari with one lakh RS
कुस्तीची १०० वर्षाची परंपरा..
बोरगावच्या बलभीम यात्रेनिमित्त जंगी कुस्ती मैदान ही शंभर वर्षाची परंपरा आहे परंतु कोरोना, महापुर या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर सलग दोन वर्ष यात्रा रद्द करण्यात आली होती परंतु चालू वर्षी शासनाने घालून दिलेल्या नियम व शर्ती यानुसार यात्रा कमिटीच्या वतीने यात्रा संपन्न झाली. मातीतील कुस्ती रुजावी व वाढावी यासाठी या कुस्ती क्षेत्राकडून या गावाचा अनेक वेळा सन्मान झाला आहे चालू वर्षी या मैदानात मुलींच्याही कुस्त्याचे संयोजन करण्यात आले होते.
भारत मदने बलभीम केसरीसह एक लाखाचा मानकरी | Bharat Madane Balbhim Kesari with one lakh RS
माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी
कोरोनता कोण आपलं होत .....पहा मराठी लघुचित्रपट कहर
मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
0 Comments