शिराळा:शिराळा सांस्कृतिक कलामंच व विराज व विश्वास उद्योग समूह आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने लायन्स क्लब (चिखली ता. शिराळा) येथे रविवार (ता. १४) नोव्हेबर रोजी दुपारी साडे बारा वाजता कलाकार मेळाव्याचे आयोजन केले असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ भरारी पथक सदस्य रंगराव घागरे यांनी दिली.
शिराळा येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी घागरे म्हणाले, शिराळा सांस्कृतिक कलामंच व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक वर्षी कलाकार मार्गदर्शन मेळावा घेतला जातो. .कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून हा मेळावा रद्द झाला होता शिराळा सांस्कृतिक कलामंचच्या माध्यमातून कलाकारांना मदत करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. परंतु अजूनही अनेक कलाकारांची नाव नोंदणी नसल्याने ते कलाकार मदतीपासून वंचित राहात आहेत.सांगली जिल्ह्यातील कलाकारांचे संघटन होऊन त्यांची नाव नोंदणी होणे गरजेचे आहे. त्यासाठी कलाकार मेळावा व कलाकार नाव नोंदणी अभियान सुरु आहे.
या कार्यक्रमास आमदार मानसिंगराव नाईक, माजी राज्य मंत्री शिवाजीराव नाईक, माजी जिल्हापरिषद उपाध्यक्ष सत्यजित देशमुख, पंचायत समिती सदस्य सम्राटसिंह नाईक, युवक राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष विराज नाईक, मनसे जिल्हाध्यक्ष तानाजीराव सावंत, नगराध्यक्षा प्रतिभा पवार उपस्थित राहणार आहेत.
यावेळी शिराळा सांस्कृतिक कलामंच अध्यक्ष विक्रम दाभाड़े,कार्याध्यक्ष वैजनाथ चौगुले, वृद्धकलाकार मानधन समिती सदस्य अंनत सकपाळ, प्रितम निकम, डॉ. शैलेश माने, रणजीत चव्हाण,अमोल जाधव, विनय हसबनीस, स्वप्निल देसाई,राजेश पाळेकर उपस्थित होते.
शिराळा येथे रविवारी कलाकार मेळावा | Artist meet on Sunday at Shirala
माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी
कोरोनता कोण आपलं होत .....पहा मराठी लघुचित्रपट कहर
मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
0 Comments