वाळवा तालुक्यातील तांबवे येथील पवन मोरे या युवकास रेल्वेत शासकीय नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ११ लाख रुपयांचा गंडा घातल्या प्रकरणी सचिन संदिपान पवार, माधुरी संदिपान पवार, महेश संदिपान पवार (सर्व राहणार तासवडे- बेलवडे ता. कराड) व संजीवनी निलेश पाटणे (रा. पुणे, आपटे वस्ती पुनावळे)यांच्या विरोधात कासेगाव पोलिसांत फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. यातील तिघांना एकूण सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
हे ही वाचा-असे एका मिनिटात मिळवा कोरोन लस प्रमाणपत्र
कासेगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वाळवा तालुक्यातील तांबवे येथील पवन सुर्यकांत मोरे हा मॅकानिकल इंजिनिअर असून सद्या एक खासगी कंपनीत नोकरीस आहे.रेल्वेत शासकीय नोकरी लावतो म्हणून माधुरी पवार,सचिन पवार, महेश पवार,व संजीवनी पाटणे यांनी पवन कडून कोरोनाच्या काळात ५ नोव्हेंबर २०१९ पासून ते ४ मार्च २०२१ पर्यंत वेळोवेळी ११ लाख रुपये घेऊन फसवणूक केली.नोकरीचे अमिष दाखवून आपणाला गंडा घातला असल्याचे पवन याच्या लक्षात आले.
त्या नंतर त्याने माधुरी पवार व इतर तिघांकडे वारंवार पैसे मागणी केली.परंतु वारंवार सांगून देखील माधुरी पवार सचिन पवार महेश पवार व संजीवनी पाटणे यांनी पैसे दिले नाहीत. याबाबत पवन मोरे यांनी कासेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. चौघांवर कासेगाव पोलिसांत फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक अविनाश मते यांचे मार्गदर्शनाखाली हवलदार आनंदा जाधव तपास करीत आहेत.यातील तिघा आरोपींना एकूण ७ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.सरकारी वकिल संतोष कुमार जाधव यांनी युक्तिवाद केला.
मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"
कोरोनता कोण आपलं होत .....पहा मराठी लघुचित्रपट कहर
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
0 Comments