BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

असा बिबट्या झाला सापळ्यात कैद |Such a leopard was captured in a trap

असा बिबट्या| झाला सापळ्यात |कैद |Such a leopard |was captured| in a | trap 


असा बिबट्या| झाला सापळ्यात |कैद |Such a leopard |was captured| in a | trap 

 

कराड : येणके (ता. कराड ) येथे आठवडाभराच्या प्रयत्नांनंतर  बिबट्याला सापळ्यात कैद करण्यात वनविभागाला यश आले आहे. मात्र, एका बिबट्याला कैद केल्यानंतर सुमारे तासाभरातच येणके गावामध्येच दुसऱ्या बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. 

असा बिबट्या| झाला सापळ्यात |कैद |Such a leopard |was captured| in a | trap 

 

काही दिवसांपूर्वी बिबट्याने ऊसतोड मजुराच्या मुलावर हल्ला करून त्याला ठार केल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेने जिल्ह्यासह राज्यभरात खळबळ उडाली होती. वनविभागाच्या पथकाकडून सदर विभागातील वनपरिक्षेत्राची पाहणी करून  येणके परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी  तीन ते चार सापळे लावण्यात आले होते. अखेर शनिवारी  मध्यरात्रीच्या सुमारास या सापळ्यात एक बिबट्या कैद झाला.  आज रविवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास परिसरात लावलेल्या सापळ्यांची पाहणी करण्यासाठी गेलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना त्यातील एका सापळ्यात बिबट्याचा एक बछडा कैद झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या बाबतची माहिती तात्काळ अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर तात्काळ वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

असा बिबट्या| झाला सापळ्यात |कैद |Such a leopard |was captured| in a | trap 

 

        एका बिबट्याला कैद केल्यानंतर सुमारे तासाभरातच सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास येणके गावमध्येच ग्रामस्थांना दुसऱ्या बिबट्याचे दर्शन झाले. येथील येणके-किरपे रस्त्यालगत असलेल्या एका शेतातील विहिरीजवळ शेतात काम करण्यासाठी निघालेल्या शेतकरी, युवकांना हा बिबट्या दिसला. त्यामुळे एकीकडे वनविभागाने एका बिबट्याला कैद केल्याचे ग्रामस्थांमध्ये समाधान असतानाच दुसरीकडे त्यात गावात अन्य एका बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण कायम राहिले आहे. 

असा बिबट्या| झाला सापळ्यात |कैद |Such a leopard |was captured| in a | trap 

 

     तालुक्यातील सुपने, तांबवे पाठरवाडी, येणके परिसरात सुमारे तीन ते चार बिबट्यांचा वावर असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले होते. या भागात  बिबट्याने अनेक पाळीव प्राण्यांवर हल्ले करून त्यांना ठार केले होते.  शेतात काम करणाऱ्या महिलेसह दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या युवकावरही बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे ग्रामस्थांनी वनविभागाकडे बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. 

असा बिबट्या| झाला सापळ्यात |कैद |Such a leopard |was captured| in a | trap 

 अंत्री गणपती गीत 

 आता खरच याची गरज आहे- टमरेल मराठी लघु चित्रपट 

  माझ्या विविध भूमिकांची झलक फक्त तुमच्यासाठी  


मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"

कोरोनता कोण आपलं होत  .....पहा मराठी लघुचित्रपट कहर 

 

  

मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी  

 

प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖     
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            

 

Post a Comment

0 Comments