शिराळा पोलीस ठाणे देशात लय भारी | Shirala Police Thane is good in the country
शिराळा पोलीस ठाणे देशात लय भारी | Shirala Police Thane is good in the country
शिराळा: देशातील सर्वोत्तम पोलीस ठाण्यामध्ये शिराळा पोलीस ठाण्याचा सातवा तर राज्यात पहिला क्रमांक आला असल्याने शिराळचा नावलौकिक देशभर पसरला आहे.
शिराळची नागपंचमी, चांदोली राष्ट्रीय उद्यान, चांदोली धरण यामुळे शिराळा तालुक्यात लौकिक आहेच. आता या पोलीस ठाण्याची सर्वोत्तम पोलीस ठाणे म्हणून नोद झाल्याने या लौकिकात आणखी भर पडली आहे.
शिराळा पोलीस ठाणे देशात लय भारी | Shirala Police Thane is good in the country
केंद्रीय गृह मंत्रालया मार्फत सर्वोत्तम पोलीस ठाण्यांची निवड करणे, श्रेणी देणे व मूल्यांकन करण्यासाठी वार्षिक सर्वेक्षण करतात. त्यांतर निवडक दहा पोलीस ठाण्यांची नावे वार्षिक परिषदेदरम्यान जाहीर केली जातात. यासाठी सल्लागार फर्म म्हणून मेसर्स ट्रान्स रूरल अॅग्री कन्सल्टिंग सर्व्हिसेस प्रा. लि. ला गृहमंत्रालयाने देशातील सर्वोत्तम पोलीस ठाणे ओळखण्यासाठी सर्वेक्षणाच्या अंमलबजावणीची जबाबदारी दिली होती.. या पथकाने शिराळा पोलीस ठाण्याला भेट दिली होती. या संदर्भातील प्रमाणपत्र राज्य , केंद्रशासित प्रदेशातील या दहा पोलीस ठाण्यांना देखील प्रदान केले जाणार आहे.
देशातील ७५ पोलीस ठाण्याचे सर्वेक्षण करून १० पोलीस ठाण्यांची निवड करण्यात येणार होती. याबाबत अंतिमनिर्णय होउन शिराळा पोलीस ठाण्याने देशात सातवा तर राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे.
शिराळा पोलीस ठाणे देशात लय भारी | Shirala Police Thane is good in the country
येथील पोलीस ठाण्याची इमारत , परिसर , याठिकाणी केलेली वृक्ष लागवड,विद्युत रोषणाई , स्वच्छता , सुविधा , गुन्हे , रेकॉर्ड , गुन्हे तपास , अधिकारी व कर्मचारी वर्गाचे नागरिकांशी सवांद , गुन्हे निर्गती प्रमाण ,सिसिटीव्ही , फलक, अद्यावत गोष्टीची तपासणी व पाहणी केली होती..
शिराळा पोलीस ठाणे देशात लय भारी | Shirala Police Thane is good in the country
यासाठी विभागीय पोलीस अधीक्षक कृष्णात पिंगळे,पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार , सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र लोहार, पोलीस उपनिरीक्षक अविनाश वाडेकर आणि अधिकारी व कर्मचारी वर्गाने पोलीस ठाण्याचा कायापालट करण्यासाठी प्रयत्न केला आहे.
शिराळा पोलीस ठाणे देशात लय भारी | Shirala Police Thane is good in the country
देशातील दहा क्रमांकामध्ये
१)सदर बझार दिल्ली,
२) गंगापूर ओरिसा,
३) बट्टू कलाना हरियाणा,
४)वालपोई गोवा,
५) मानवी कर्नाटक,
६) कडमट लक्षद्वीप,
७) शिराळा महाराष्ट्र्,
८)थोटीय्याम तमिळनाडू,
९) बसंतगर जम्मूकाश्मीर,
१०) रामपूर चौराम बिहार
शिराळा पोलीस ठाणे देशात लय भारी | Shirala Police Thane is good in the country
चेहऱ्याला रंग लावण्यापूर्वी आपली अभिनय क्षमता ओळखा- अभिनेते सुशांत शेलार|Before painting your face, recognize your acting ability - Actor Sushant Shelar
मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"
कोरोनता कोण आपलं होत .....पहा मराठी लघुचित्रपट कहर
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
0 Comments