१ हजार| नागरिकांना मोफत |चष्मे वाटप| Distribution| of free spectacles |to 1000 |citizens
१ हजार| नागरिकांना मोफत |चष्मे वाटप| Distribution| of free spectacles |to 1000 |citizens
इस्लामपूर: शहरातील १ हजार नागरिकांना युवा नेते प्रतिकदादा पाटील यांच्या हस्ते मोफत चष्मे वाटप करण्यात आले. शहरातील ७५ नागरिकांच्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या असून येत्या काही दिवसात १२५ मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
हे ही वाचा-असे एका मिनिटात मिळवा कोरोन लस प्रमाणपत्र
१ हजार| नागरिकांना मोफत |चष्मे वाटप| Distribution| of free spectacles |to 1000 |citizens
राज्याचे जलसंपदा मंत्री ना.जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इस्लामपूर येथील विजया सांस्कृतिक भवनमध्ये इस्लामपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस, डॉक्टर सेल, जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानच्यावतीने हा उपक्रम पार पडला. राजारामबापू ज्ञान प्रबोधिनीचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील,उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजी पाटील,नगरसेवक विश्वनाथ डांगे,संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष संजय पाटील, डॉक्टर सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.अतुल मोरे, डॉ.प्रकाश म्हाळुंगकर,जयंत नेत्रालयचे उमेश पवार,महिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव,शहराध्यक्षा रोझा किणीकर, प्रदेश सदस्या कमल पाटील यांची प्रमुख उपस्थित होती. लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
१ हजार| नागरिकांना मोफत |चष्मे वाटप| Distribution| of free spectacles |to 1000 |citizens
यावेळी पाटील पुढे म्हणाले,ना.जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात ९ ठिकाणी आरोग्य शिबीरे घेवून ४५०० रुग्णांची मोफत तपासणी व उपचार केले. यातील २०० रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणार आहोत. सध्या ७५ शस्त्रक्रिया जयंत नेत्रालय मध्ये केल्या आहेत. उर्वरित शस्त्रक्रिया काही दिवसात करणार आहोत.
१ हजार| नागरिकांना मोफत |चष्मे वाटप| Distribution| of free spectacles |to 1000 |citizens
उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील म्हणाले, ना.जयंतराव पाटील यांनी गेल्या ३५ वर्षात शहरातील नागरिकांना जशी निष्काम सेवा दिली,तशीच सेवा प्रतिकदादा देत आहेत. ना. पाटील यांनी शहरातील ११०० नागरिकांना अ गटातून धान्य सुरू केले आहे.
१ हजार| नागरिकांना मोफत |चष्मे वाटप| Distribution| of free spectacles |to 1000 |citizens
जयंत नेत्रालयचे उमेश पवार म्हणाले, जयंत नेत्रालयात २०० पैकी ७५ मोती बिंदू शस्त्रक्रिया झाल्या आहेत. यातील काही रुग्ण असे होते,त्यांच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया तातडीने झाली नसती,तर त्यांना अंधत्व आले असते.
डॉक्टर सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.अतुल मोरे म्हणाले, शहरातील आरोग्य शिबीरात ३५० मधुमेह,तर ७०० उच्च रक्तदाबाचे नवे रुग्ण मिळाले. या नागरिकांना आपणास रक्तदाब,मधुमेह आहे,याची कल्पना ही नव्हती.
१ हजार| नागरिकांना मोफत |चष्मे वाटप| Distribution| of free spectacles |to 1000 |citizens
रोझा किणीकर म्हणाल्या,ना.जयंतराव पाटील,प्रतिकदादा पाटील हे शहरातील सर्व सामान्य नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून देत आहेत.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष मुनीर पटवेकर, नगरसेवक बशीर मुल्ला,युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सचिन कोळी,शकील जमादार, डॉ.माने,डॉ.सूर्यवंशी,जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानचे समन्वयक इलियास पिरजादे, शैलेश पाटील,शैलजा जाधव,बूथ अध्यक्ष संजय जाधव,मानसिंग पाटील,रणजित गायकवाड,वैभव भोसले,पुष्पलता खरात, मनिषा पेठकर, प्रतिभा पाटील,सुवर्णा जगताप यांच्यासह बूथ अध्यक्ष,महिला कार्यकर्त्या,तसेच लाभार्थी उपस्थित होते.
१ हजार| नागरिकांना मोफत |चष्मे वाटप| Distribution| of free spectacles |to 1000 |citizens
प्रारंभी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. इस्लामपूर संघटक राजाराम जाधव यांनी सूत्र संचालन केले. बूथ अध्यक्ष केदार पाटील यांनी आभार मानले.
१ हजार| नागरिकांना मोफत |चष्मे वाटप| Distribution| of free spectacles |to 1000 |citizens
अंत्री गणपती गीत
मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"
कोरोनता कोण आपलं होत .....पहा मराठी लघुचित्रपट कहर
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
0 Comments