इस्लामपूर :महादेववाडी ता, वाळवा येथून श्री.दत्तजयंतीनिमित्त श्री.क्षेत्र नारायणपूरला जाणारा पायी दिंडी पालखी सोहळा बुधवार दि.१ डिसेंबरपासून सुरू होत आहे. गुरुवार दि.१७ डिसेंबर रोजी हा पालखी सोहळा श्री.क्षेत्र नारायणपूर येथे पोहचणार असून या दिवशी सायंकाळी जन्म सोहळा संपन्न होणार आहे. पायी दिंडी पालखी सोहळ्याचे हे २७ वे वर्ष आहे. ही माहिती प्रताप सरनोबत (इस्लामपूर),भुजंग पाटील (येडेनिपाणी) यांनी दिली.
बुधवार दि.१ रोजी सायंकाळी ५ वाजता महादेववाडी (ता.वाळवा) येथे ग्राम प्रदक्षणा, महाप्रसाद व मुक्काम होईल.
गुरुवार दि.२ रोजी सकाळी ९ वाजता श्री.क्षेत्र प्रयाग चिखली (ता.करवीर) येथून श्री.क्षेत्र नारायणपूरकडे दिंडी प्रस्थान करून कोल्हापूर येथे मुक्काम होईल.
शुक्रवार दि.३ रोजी हेर्ले,पेठवडगाव,भादुलेमार्गे शिगाव (ता.वाळवा) येथे मुक्काम होईल.
शनिवार दि.४ रोजी फारणेवाडी,ढवळी,नागाव, भडकंबे,गोटखिंडीमार्गे येडेनिपाणी येथे मुक्काम.
रविवार दि.५ रोजी कामेरी (मळा) इस्लामपूरमार्गे राजारामनगर येथे मुक्काम.
सोमवार दि.६ रोजी बोरगाव,गौंडवाडी, साटपेवाडीहुन तुपारी (ता.पलूस) मार्गे देवराष्ट्रे मुक्काम.
मंगळवार दि.७ रोजी मोहिते वडगाव,अंबक,तडसर,कडेपूर,कडेगाव,सोहोली फाटा येथे मुक्काम.
बुधवार दि.८ रोजी पारगाव, गोरेगांव, पुसेसावळीमार्गे कळंबी मुक्काम.
हे ही वाचा -शिराळा आगाराच्या एस. टी,वर दगड फेक
गुरुवार दि.९ रोजी मांडवगना वस्ती, गणेशवाडीमार्गे कलामंदीर औंध येथे मुक्काम.
शुक्रवार दि.१० रोजी घाटमाथा, पिंपरी फाटा, अपशिंग मुक्काम.
शनिवार दि.११ रोजी निगडी,वेलंग,एकसळ,कोरेगाव मुक्काम.
रविवार दि.१२ रोजी जळगाव,सातारा रोड, आंबवडे,खामकरवाडी मुक्काम.
सोमवार दि.१३ आसनगांव, शिरगाव घाटमाथा, शिरगाव फाटा मुक्काम.
मंगळवार दि.१४- धुमाळवाडी,जोशी विहीर, कवठे,वेळे मुक्काम.
बुधवार दि.१५ रोजी केसुर्डे फाटा, शिरवळ मुक्काम.
गुरुवार दि.१६ रोजी शिंदे वाडी फाटा,किकवी,निगडे मुक्काम.
शुक्रवार दि.१७ रोजी-कापूरहोळ,चिवेवाडी, श्री.क्षेत्र नारायणपूर येथे मुक्काम व महाप्रसाद. या दिवशी दत्त जन्म सोहळा होणार आहे.
दिंडीमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी लसीकरण (दोन डोस) केलेले हवे. सोबत आधार कार्ड,अंथरूण-पांघरूण,कपडे आदी साहित्य घ्यायला घ्यावे,अशी सूचना संयोजकांनी केली आहे..
आर.एन.मोहिते (महादेवनगर),भानुदास मोहिते (मिस्त्री),विजयकुमार माने (कोल्हापूर),अनंत मुळे (इस्लामपूर), सागर पाटील (जुनेखेड), हणमंत पाटील (तुपारी), रामचंद्र खाडे-पाटील (येडेनिपाणी), राजेश ओझा (इस्लामपूर), दत्तात्रय शेवाळे (वाळवा), सुरेश माळी (वाळवा) नानासो गाताडे (गोटखिंडी) यांच्यासह अनेक भाविक गेल्या एक-दीड महिन्यापासून दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
मैत्रीचे नाते जपणारा मराठी लघु चित्रपट " फ्रेंड " Marathi short film "Friend"
कोरोनता कोण आपलं होत .....पहा मराठी लघुचित्रपट कहर
मैत्री कोणाशी आणि कशी असावी पहा फ्रेंड ही मित्रत्वाची कहाणी
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा भाग ४
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा भाग ५
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.
0 Comments