ही मुले ग्रामीण रुग्णालय कोकरूड व उपजिल्हा रुग्णालय शिराळा येथील वाहनाने मिरज येथील यशश्री हॉस्पिटल येथे पाठविण्यात आली आहेत. तेथे त्यांची मोफत बेरा व ऑडिओ मेटरी नावाची तपासणी करून गरजेनुसार त्यांना मोफत श्रवण यंत्रे तसेच कॉकलीअर इन प्लांट व इतर शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे.
शिराळा तालुक्यामध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत दोन पथके कार्यरत असून त्यामध्ये डॉ प्रकाश मोरे ,डॉ संदीप साळी,डॉ सुवर्णा पाटील ,डॉ प्रियंका चव्हाण हे वैद्यकीय अधिकारी व श्री अमोल रसाळ, सौ यशश्री माने औषध निर्माण अधिकारी सौ सुषमा पाटील व लक्ष्मी कांबळे हे कर्मचारी कार्यरत आहेत. या शिबिरासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ आदिक पाटील, डॉ जुबेर मोमीन, डॉ अनिरुद्ध काकडे सर्व वैद्यकीय अधिकारी कर्मचारी, वैद्यकीय अधीक्षक कोकरूड डॉ इनामदार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रवीण पाटील ,सर्व शिक्षा अभियानांतर्गत कार्यरत सर्व शिक्षक अंगणवाडी सेविका, मदतनीस आशा यांचे योगदान लाभले.
0 Comments