BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

दुचाकी वाहनांकरिता एम. एच. १०. डी.एस. ही नवीन मालिका | for two-wheelers. MH. 10. D.S. This new series

  दुचाकी वाहनांकरिता एम. एच. १०. डी.एस. ही नवीन मालिका |  for two-wheelers. MH. 10. D.S. This new series

दुचाकी वाहनांकरिता नवीन मालिका आजपासून सुरू- उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे

सांगली, दि. 13, (जि. मा. का.) :‍ उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सांगली करीता नव्याने नोंदणी होणाऱ्या दुचाकी वाहनांकरिता  एम एच १० डी.एस. ही नवीन मालिका गुरूवार, दि. १४ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे यांनी दिली.

अधिक माहितीसाठी जाहिरातीवर 👇क्लिक करा.

 दुचाकी वाहनांकरिता एम. एच. १०. डी.एस. ही नवीन मालिका |  for two-wheelers. MH. 10. D.S. This new series

एम एच १० डी.एस. ही नवीन मालिका गुरूवार, दि. १४ ऑक्टोबर २०२१ रोजी दुचाकी वाहनांकरिता सुरू होत असून या मालिकेव्यतिरिक्त इतर वाहनांसाठी आकर्षक क्रमांक हवा असेल तर तिप्पट फी भरून आकर्षक नोंदणी क्रमांक देण्यात येईल. पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल. पसंतीच्या नोंदणी क्रमांकाच्या अर्जासोबत केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ च्या नियम ४ तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियमाच्या ५(अ) मध्ये विहित केलेल्या पुराव्याची छायांकित प्रत - आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड इत्यादीची साक्षांकित प्रत, इमेल आयडी आवश्यक आहे. पसंतीचे नोंदणी क्रमांक वाहन ४.० या संगणकीय प्रणालीवर देण्यात येणार असून त्याची वेळ सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत आहे.

 दुचाकी वाहनांकरिता एम. एच. १०. डी.एस. ही नवीन मालिका |  for two-wheelers. MH. 10. D.S. This new series

 पसंतीच्या नोंदणी क्रमांकाच्या अर्जासोबत विहीत शुल्काचा डिमांड ड्राफ्ट सादर करणे बंधनकारक आहे. एकाच क्रमांकासाठी अनेक अर्ज आल्यास सायंकाळी ६ वाजेपर्यंत निर्धारित फी पेक्षा जादा रकमेचा डी.डी. जो अर्जदार सादर करेल, त्यास तो क्रमांक दिला जाईल. आकर्षक क्रमांकासाठी ३० दिवसाच्या आत वाहन नोंदणी करणे बंधनकारक राहील, असे प्रसिध्दीपत्रकाव्दारे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे कळविण्यात आले आहे.

 दुचाकी वाहनांकरिता एम. एच. १०. डी.एस. ही नवीन मालिका |  for two-wheelers. MH. 10. D.S. This new series

Post a Comment

0 Comments