शिराळा:विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्यात समन्वय ठेवून शैक्षणिक कामकाज केल्यास विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारेल व शाळांच्या भौतिक गरजा पूर्ण होतील असे प्रतिपादन शिराळा पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी सौ सुनंदा पाटील यांनी केले .
त्या जिल्हा परिषद शाळा सिद्धार्थ नगर आरळा येथे शाळा भेटी वेळी बोलत होत्या. यावेळी शाळेचे डिजिटल वर्गखोली, सुसज्ज कार्यालय बोलक्या भिंती बोलक्या पताका, सुंदर अक्षरात लिहिलेले बोध पर सुविचार, आदी लोकसहभागातून केलेली कामे पाहून शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांचे अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांचा दर्जा, बालगीते, पाढे पाठांतर, इंग्रजी शब्द पाठांतर ,वाचन व लेखन,कथाकथनआदी गोष्टींची विद्यार्थ्यात रममान होऊन आनंददायी पध्दतीने मुलांच्या बरोबर गप्पागोष्टी करत तपासणी केली.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मोहन पवार, शिक्षिका लताराणी पाटील, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा नेत्रा झाडे,सूर्याजी सुतार व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी शाळेच्या वतीने शिक्षण विस्तार अधिकारी सौ पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
0 Comments