या कारखान्याचा ऊस का अडवू नये ?Why not block the cane of this factory?
या कारखान्याचा ऊस का अडवू नये ?Why not block the cane of this factory?
शिराळा तालुक्यातील निनाईदेवी (दालमिया शुगर) कारुंगली या कारखान्याने ऊसदराची कोंडी फोडून एक रकमी एफआरपी २९५० रुपये देणार असल्याचे जाहीर केल्याबद्दल कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी शिवाजी पाटील यांचा सत्कार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या हस्ते करण्यात आला.
या कारखान्याचा ऊस का अडवू नये ?Why not block the cane of this factory?
स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक संदीप कुंभार व प्रशासकीय अधिकारी शिवाजी पाटील यांच्याशी एक रकमी एफआरपी वजनातील काटामारी आणि तोडणीला द्यावे लागणारे पैसे बंद झाले पाहिजेत या बाबत चर्चा झाली.
शिवाजी पाटील म्हणाले, गतवर्षी एकरकमी एफआरपी दिली आहे. यावर्षीही आम्ही एक रकमी एफआरपी २९५० रुपये देणार आहोत.उसाच्या गाड्या वजन करून आणाव्यात .वजन पारदर्शीपणे केले जाईल. तोडीसाठी पैसे घेवू नये याबाबत यंत्रणेला सूचना दिल्या जातील.
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले, कारखान्याने एफआरपी. एक रकमी जाहीर केल्यामुळे आम्ही त्यांचे अभिनंदन करतो. या कारखान्याच्या तोडी सुरू राहतील. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कुठेही अडवा अडवी करू नये. यावेळी वाळवा तालुकाध्यक्ष भागवत जाधव,शिराळा तालुकाध्यक्ष मानसिंग पाटील, राम पाटील शिवलिंग शेटे,संदीप शिरोटे,अधिक पाटील, भिमाशंकर पाटील फत्तेसिंग गायकवाड उपस्थित होते.
या कारखान्याचा ऊस का अडवू नये ?Why not block the cane of this factory?
0 Comments