BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

कोणता मांगूर |मासा शरीरासाठी अपायकारक |आणि हितकारक | Which catfish | is harmful |and beneficial | for the body |

  कोणता मांगूर |मासा शरीरासाठी | अपायकारक आणि हितकारक | Which | catfish is harmful | and beneficial | for the | body

कोणता मांगूर |मासा शरीरासाठी | अपायकारक आणि हितकारक | Which | catfish is harmful | and beneficial | for the | body

 

मांगूर या माशाचे दोन प्रकार आहेत. एक शरीरासाठी अपायकारक तर दुसरा हितकारक  आहे. या माशामध्ये विदेशी थाई मांगूर (Clarias gariepenius)  हा मांसभक्षक आहे. याची  वाढ लवकर होत असल्याने या माशाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते,देशी मांगूरला (Clarias batrachus) चांगली मागणी असून मानवी शरीरासाठीही तो फायदेशीर आहे, 

कोणता मांगूर |मासा शरीरासाठी | अपायकारक आणि हितकारक | Which | catfish is harmful | and beneficial | for the | body

 

आशिया खंड आणि प्रामुख्याने भारतात मांगूर ही मत्स्य प्रजात खूप प्रसिद्ध आहे. मांगूर मासा हा त्याच्या लांब मिशांमुळे कॅटफिश माशांमध्ये समाविष्ट आहे. मुख्यतः देशी मांगूर (Clarias batrachus) व हायब्रीड थाई मांगूर (Clarias gariepenius) या दोन प्रकाराच्या माशांचे भारतात संवर्धन आणि विक्री केली जाते.विदेशी थाई मांगूर मासा मानवी आरोग्यासाठी हानिकारक असून तो दिसायला देशी माशासारखाच दिसतो, त्यामुळे देशी आणि विदेशी थाई मांगूर माशांतील फरक ओळखणे आवश्यक आहे.

कोणता मांगूर |मासा शरीरासाठी | अपायकारक आणि हितकारक | Which | catfish is harmful | and beneficial | for the | body

काय आहे फरक  देशी आणि विदेशी मांगूर माशात  

१ ) देशी मांगूर (Clarias batrachus)

  • हा मासा त्याच्या उत्तम चवीसाठी, बाजारभावासाठी व तलावातील अधिक उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.

  • या माशामध्ये खनिजतत्त्वे, लोह व प्रथिने यांचे प्रमाण अधिक असते आणि मेदाचे प्रमाण फार कमी असते.

  • या माशाच्या औषधी गुणधर्मामुळे न्यूट्रिशिअस मासा म्हणून ओळखला जातो.

 

२ ) विदेशी थाई मांगूर(Clarias gariepenius)

  • हा मासा वाघूर, मगर, मागुरी या नावांनीही ओळखला जातो.

  • हा मासा पूर्णतः मांसाहारी असून पाण्यातील नैसर्गिक परिसंस्था व जैवविविधतेसाठी अत्यंत घातक आहे. 

  • हायब्रीड मागूर माशाच्या खाद्यपद्धतीमुळे हा मासा नैसर्गिक परिसंस्थेमध्ये असलेल्या इतर स्वदेशी माशांकरिता हानिकारक ठरत आहे. हा मासा अनधिकृतरीत्या भारतात दाखल झाला.

  • अनेक शास्त्रीय अभ्यासांतून असे निदर्शनास आलेले आहे, की विदेशी मागूर माशाचे सेवन हे शरीराकरिता हानिकारक आहे.

  • हा मासा कमी खर्चात मोठ्या प्रमाणात उत्पन्न देत असल्याने या माशांच्या संवर्धनासाठी अनधिकृतरीत्या वापरल्याचे दिसून येते.

  • मांगूर माशाचे प्रजनन, मत्स्यपालन, वाहतूक व विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

कोणता मांगूर |मासा शरीरासाठी | अपायकारक आणि हितकारक | Which | catfish is harmful | and beneficial | for the | body

  

या दोन माशांत  एकसारखेपणा  मग ओळायचे कसे. 

१ ) देशी मांगूर

  1. तांबूस काळ्या रंगाचा हा मासा आकाराने लहान असतो व संपूर्ण जीवनकाळात या माशाचे कमाल वजन हे फक्त १ किलोग्राम इतके वाढू शकते; पण बाजारात २५०-३०० ग्रॅम वजनापर्यंतच्या माशाला चांगली मागणी आहे.
  2. या माशाच्या कवटीवर इंग्रजी यू (U) आकाराचे चिन्ह असते.
  3. या माशाची वाढ ही थाई मांगूर पेक्षा मंद असते.
  4. हा मासा प्रतिकिलो ३५०-५०० रुपये दराने विकला जातो. 

 

२) विदेशी थाई मांगूर

  1. थाई मांगूर जातीचा मासा हा अतिशय प्रतिकूल परिस्थितीत वाढू शकतो. तसेच, घाण पाण्यात अथवा कमी पाण्यात अगदी चिखलातही हा मासा वाढतो.
  2. याचे कमाल वजन हे ३० किलोपर्यंतसुद्धा जाऊ शकते.
  3. या माशाच्या कवटीवर इंग्रजी V आकाराचे चिन्ह असते.
  4. मार्केटमध्ये टबमध्ये कमी पाण्यात जिवंत मासा म्हणून विकला जातो. या माशाची किंमत ९०-१३० रुपये प्रतिकिलोपर्यंत असते. विस्तृत तोंडामुळे हा मासा तुलनेने मोठी शिकार संपूर्ण गिळण्यास सक्षम आहे
  5. हा मासा साधारणपणे ३-४ फूट लांबीपर्यंत वाढतो, तसेच हा मासा हवेतून प्राणवायू घेऊन श्वसन करत असल्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतही या माशाची वाढ होते.
  6. या माशांचे संवर्धन करताना कमी खर्चात अधिक उत्पादन मिळण्यासाठी या माशाला कोंबड्यांची घाण, खाण्यायोग्य नसलेले कोंबडीचे मांस, तसेच कत्तलखान्यातील कुजलेले शेळ्या, गाई, म्हशी यांचे मांस खाद्य म्हणून वापरले जाते, यामुळे पर्यावरणाचे प्रदूषण होत असल्याचे आढळून येते.

कोणता मांगूर |मासा शरीरासाठी | अपायकारक आणि हितकारक | Which | catfish is harmful | and beneficial | for the | body

विदेशी थाई मांगूरवर बंदी का आहे

 

१) नैसर्गिक परिसंस्थांना हानी

हा मासा जलीय पर्यावरणासाठी हानिकारक ठरतो, त्यामुळे मागूर मासा इतर मासे, तसेच जलीय परिसंस्थांमधील इतर घटकांना हानिकारक ठरतो, तसेच इतर प्रजाती लुप्त होण्यास कारणीभूत समजला जातो. थाई मागूर प्रामुख्याने इतर मासे, पाण्याजवळ येणारे लहान पक्षी, प्राण्याचे सडलेले मांस, पाण्याच्या तळाशी साचलेला जैविक कचरा इत्यादी न मिळाल्यास अजैविक कचरा इत्यादीसुद्धा खाद्य म्हणून स्वीकार करतो.

२) मानवी आरोग्यासाठी हानिकारक

हा मासा अनेकदा अजैविक कचरासुद्धा खाद्य म्हणून सेवन करतो. माशाच्या मांसात अनेकदा जड धातू जसे झिंक, कॅडमिअम आणि आर्सेनिक इत्यादीचे संक्रमणसुद्धा आढळून आलेले आहे. हे धातू मानवी शरीरासाठी अत्यंत हानिकारक आहेत.

कोणता मांगूर |मासा शरीरासाठी | अपायकारक आणि हितकारक | Which | catfish is harmful | and beneficial | for the | body

 


Post a Comment

0 Comments