BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मतभेद विसरून काम केल्यास |विरोधकांना नमवण्याची ताकद |आपल्यात आहे.|We have the power |to subdue our opponents | if we forget our differences|

 मतभेद विसरून काम केल्यास  |विरोधकांना नमवण्याची ताकद |आपल्यात आहे.|We have the power  |to subdue our opponents  | if we forget our differences|

शिराळा : स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेब यांच्या विचाराचा मूळ प्रवाह संघटित करून एकसंघ राहून.आपआपसात  कोणतेही मतभेद न ठेवता गावागावात काम करा. आपल्या समोरील  कोणत्याही शक्‍तीला  नमवण्याची  ताकद कार्यकर्त्यांमध्ये आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख यांनी केले.

 मतभेद विसरून काम केल्यास  |विरोधकांना नमवण्याची ताकद |आपल्यात आहे.|We have the power  |to subdue our opponents  | if we forget our differences|

 शिरशी (ता.शिराळा ) येथे प्रमुख कार्यकर्त्यांच्या विभागीय बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक प्रमुख उपस्थित होते.  रणजितसिह  नाईक,माजी पंचायत समिती सभापती हणमंतराव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य के. डी. पाटील, बाजार समिती सभापती सुजित देशमुख प्रमुख उपस्थित होते.

यावेळी बोलताना सत्यजित देशमुख म्हणाले ,उत्तर भागाचे नेतृत्व पहिल्यापासून देशमुख साहेबांच्या विचाराने झाले आहे. शिवाजीराव नाईक यांनी देखील या विभागाचे नेतृत्व केले.या नेतृत्वामुळे या विभागाचा विकास झालेला आहे. हे मान्यच करावे लागेल .गिरजवडे, टाकवे ,मोरणा ,करमजाई धरणांमुळे या विभागातील शेती आणि शेतकरी समृद्ध झालेला आहे .कोट्यावधी रुपये खर्च करून दळणवळणाचे प्रश्न मार्गी लावलेत. लोकांचे व्यक्तिगत प्रश्न देखील अनेक वेळा मार्गी लावले. कधीही कोणत्याही व्यक्तीला तू कोणत्या पक्षाचा विचारले नाही. विकासकामात राजकारण आणले नाही.आताचे लोकप्रतिनिधी आपली जबाबदारी न पाहता लोकांवर मेहरबानी केल्याप्रमाणे विकास निधी वाटप करतात. स्वतःच्या खिशातील दिल्याप्रमाणे पक्षांतर करा तरच काम होईल अशी प्रवृत्ती बळावली आहे .हे चुकिचे  आहे.

 मतभेद विसरून काम केल्यास  |विरोधकांना नमवण्याची ताकद |आपल्यात आहे.|We have the power  |to subdue our opponents  | if we forget our differences|

शिवाजीराव नाईक म्हणाले, उत्तर भागाने नेहमी माझी पाठराखण केलेली आहे. या विभागातील असणाऱ्या लोकांच्या आशीर्वादामुळे अनेक पदांपर्यंत मी पोहोचू शकलो. लोकांचे पाठबळ असेल तर निश्चितपणे आपण मागे राहत नाही. कोरोनाच्या  महामारीमुळे  आपणाला गेल्या दीड-दोन वर्षांत बाहेर पडता येत नव्हते .कार्यकर्त्यांशी संवाद साधावा यासाठी आम्ही हे मेळावे आयोजित केले आहेत.विरोधकांनी पक्षांतराचा रोग तालुक्यात आणलेला आहे .आमिषे दाखवून आश्वासने देऊन चुकीच्या पद्धतीने लोकांची फसवणूक केली जात आहे .याचा अर्थ असा की ,त्यांचा स्वतः वरती आणि त्यांच्या  कार्यकर्त्यांवर देखील विश्वास राहिलेला नाही .

 मतभेद विसरून काम केल्यास  |विरोधकांना नमवण्याची ताकद |आपल्यात आहे.|We have the power  |to subdue our opponents  | if we forget our differences|

यावेळी प्रकाश पाटील, शिरशी सरपंच एम.बी भोसले, उपसरपंच सर्जेराव महिंद, संजय महिंद, भटवाडी सरपंच विजय महाडिक ,भास्कर महिंद,गणपती भोसले, भिमराव नाटूलकर, संपत नाटूलकर ,जयसिंग ढवळे,  सुरेश दंडवते, संतोष दंडवते ,तात्यासो धुमाळ ,सचिन चव्हाण, सुरेश चव्हाण ,बाबाजी चव्हाण ,सुनील माने, सरपंच शरद गुरव,दत्ताजी महाडीक,हरीश पाटील, महादेव पाटील ,युवराज पाटील, तात्यासो धुमाळ ,सुभाष धुमाळ, प्रकाश पाटील, वसंत शेटके ,तानाजी जाधव, संभाजी पाटील ,डॉक्टर एम सी पाटील ,प्रकाश पाटील पाचुंब्री, विश्वास पाटील ,बाबाजी चव्हाण, बजरंग कुंभार ,महेश साळुंखे पिनू पाटील ,शामराव परीट, विजय पाटील, पांडुरंग पाटील, गजानन पाटील, उत्तम पाटील, सतीश पाटील ,अर्जुन पाटील देवेंद्र पाटील ,आदी सह विविध संस्थांचे पदाधिकारी, विविध गावचे सरपंच ,उपसरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 मतभेद विसरून काम केल्यास  |विरोधकांना नमवण्याची ताकद |आपल्यात आहे.|We have the power  |to subdue our opponents  | if we forget our differences|

 ६ ऑक्टोबर  | दिन विशेष |October 6 | is a special day|

  ६ ऑक्टोबर  | दिन विशेष |October 6 | is a special day|

शालेय,महाविद्यालयीन व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त असणारी माहिती दररोज प्रसिद्ध केली जाईल.ही माहिती सर्वांनी आपल्या मित्रांना ही शेअर करावी.

६ ऑक्टोबर  | दिन विशेष |October 6 | is a special day|

  ६  ऑक्टोबर    

१ )वन्यपशु दिन (Wildlife Day)

 २) शास्त्रज्ञ डॉ.मेघनाथ साहा जन्मदिन ( १८ ९ ३ ) ( Scientist Dr. Meghnath Saha's birthday  (1893)

 ३) दुसरे नानासाहेब पेशवे स्मृतिदिन ( १८५८ )(Second Nanasaheb Peshwa Memorial Day (1858)

  ४ ) जेसन लुईस याने व्हाल्याच्या होडीतून  पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली. (Jason Lewis completes a circumnavigation of the earth in a boat.)

 ५ ) १९८७ फिजी प्रजासत्ताक बनले.(1987 Fiji becomes a republic.)

 ६) १९८१ इजिप्तचे अध्यक्ष अन्वर सादत  यांची हत्त्या. (1981 - Assassination of Egyptian President Anwar Sadat.)

 ७) पुणे आकाशवाणी केंद्राचे सांगली हे उपकेंद्र सुरु झाले.(Sangli sub-station of Pune All India Radio was started.)

 ८) १९४९ पंडित जवाहरलाला नेहरू यांच्या हस्ते खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (NDA)इमारतीची कोनशीला बसवण्यात आली. (1949 Pandit Jawaharlal Nehru lays the cornerstone of the National Defense Academy (NDA) building at Khadakwasla.)

-----------------------------------------------------------------------

 ६ ऑक्टोबर  | दिन विशेष |October 6 | is a special day|

                       म्हणी आणि अर्थ

अडला नारायण गाडवाचे पाय धरी   - बलाढ्य व्यक्ती गरज असताना कोणत्याही  व्यक्तीकडे मदतीची याचना करू शकतो. 

-----------------------------------------------------------------------

६ ऑक्टोबर  | दिन विशेष |October 6 | is a special day|

आजचा सुविचार 

लोकांना सुंदर विचार नाही, तर सुंदर चेहरे आवडतात 

---------------------------------------------------------------------------

 ६ ऑक्टोबर  | दिन विशेष |October 6 | is a special day|

शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा  

Post a Comment

0 Comments