BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

वाकुर्डे योजनेच्या बंदिस्त पाईपमधून डिसेंबर अखेर पाणी मिळेल-माजी आमदार शिवाजीराव नाईक | Water will be available from closed pipes of Wakurde scheme by the end of December: Former MLA Shivajirao Naik

शिराळा :वाकुर्डे बुद्रुक उपसा जलसिंचन योजनेच्या बंदिस्त पाईप लाईनची कामे डिसेंबर अखेर पर्यंत पूर्ण करून त्याची चाचणी घ्यावी आणि शेतकऱ्यांच्या शिवारात डिसेंबर अखेर पाणी द्यावे अशी मागणी जलसंपदा विभागाकडे केली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी बंदिस्त पाईप लाईनची कामे पूर्ण झालेल्या ठिकाणी पाणी पुरवठा करण्यात येणार आहे असे सांगितले. त्याबाबतची माहिती  माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

वाकुर्डे योजनेच्या बंदिस्त पाईपमधून डिसेंबर अखेर पाणी मिळेल-माजी आमदार शिवाजीराव नाईक | Water will be available from closed pipes of Wakurde scheme by the end of December: Former MLA Shivajirao Naik 

येथील नागमणी विश्रामगृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक, भाजपा तालुकाध्यक्ष सुखदेव पाटील, विश्वास कारखान्याचे संचालक रणजितसिंह नाईक, वाळवा तालुका अध्यक्ष सी. एच. पाटील, मदन पाटील, प्रकाश पाटील, प्रशांत पाटील, विनोद पन्हाळकर, अरविंद बुद्रुक, जयकर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

वाकुर्डे योजनेच्या बंदिस्त पाईपमधून डिसेंबर अखेर पाणी मिळेल-माजी आमदार शिवाजीराव नाईक | Water will be available from closed pipes of Wakurde scheme by the end of December: Former MLA Shivajirao Naik 

वाकुर्डे योजनेच्या सद्यस्थिती बद्दल माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता एम. एस. सुर्वे, कार्यकारी अभियंता देवाप्पा शिंदे आणि इतर अधिकाऱ्यांच्या सोबत कोल्हापूर येथे सिंचन भवन मध्ये व्यापक बैठक घेतली होती. त्या बैठकची माहिती पत्रकार परिषदेत देताना माजी मंत्री शिवाजीराव नाईक म्हणाले, वारणा डाव्या कालव्यातून येणारे पाणी खिरवडे येथे लिफ्टने उचलून ते हातेगाव तलावात सोडले येऊन तेथून बोगद्यातून वाकुर्डे बुद्रुक येथील करमजाई तलावात आणण्यात आले आहे. या तलावातून येणपे बोगद्यातून कॅनॉल द्वारे कराड तालुक्यातील १४ गावांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तर मोरणा नदीतून वाकुर्डे बुद्रुक करमजाई तलाव पासून मांगले पर्यंत मोरणा नदीच्या दोन्ही बाजूच्या गावांना पाणी देण्याचे सुरू आहे.

वाकुर्डे योजनेच्या बंदिस्त पाईपमधून डिसेंबर अखेर पाणी मिळेल-माजी आमदार शिवाजीराव नाईक | Water will be available from closed pipes of Wakurde scheme by the end of December: Former MLA Shivajirao Naik 

दरम्यान योजनेची कामे सुरू असताना शासन निर्णयानुसार बंदिस्त पाईप लाईनची संकल्पना पुढे आली. त्यामुळे भूसंपादनसाठी होणारा खर्च वाचला. पाणी गळती, पाणी चोरी याला मोठ्या प्रमाणात आळा बसेल. त्यानुसार बंदिस्त पाईप लाईन कामाला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते प्रारंभ झाला. सध्या अंत्री बुद्रुक तलावापासून रेड गावापर्यंत असणाऱ्या मुख्य बंदिस्त पाईप लाईनचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणणप्रमाणे डिसेंबर पर्यंत यातून पाणी पुरवठा होईल.

वाकुर्डे योजनेच्या बंदिस्त पाईपमधून डिसेंबर अखेर पाणी मिळेल-माजी आमदार शिवाजीराव नाईक | Water will be available from closed pipes of Wakurde scheme by the end of December: Former MLA Shivajirao Naik 

रेड गावापासून दोन विभागामध्ये पाईप लाईनने पाणी पुरवठा होणार आहे. यातील रेड ते रेठरेधरण तलाव पर्यंतचे बंदिस्त पाईप लाईनचे काम देखील पूर्ण झाले आहे. तसेच रेठरे धरण तलाव ते ओझर्डे ते सुरुल या बंदिस्त पाईप लाईनचे काम पूर्णत्वास आले आहे. याच विभागातील रेठरे धरण ते मरळनाथपुर या पाईप लाईनचे काम १५ दिवसात पूर्ण होईल. इथून पुढे तिच पाईप लाईन वाघवाडी पासून शिवपुरी गावच्या पश्चिम बाजूने कामेरी शिवारात जाते. तिथे कामेरीच्या मुख्य ओढ्यात पाणी सोडण्यात येणार आहे. तेही काम अंतिम टप्यात आहे. त्यामुळे रेठरे धरण, सूरुल, ओझर्डे, पेठ तसेच मरळनाथपुर धुमाळवाडी, वाघवाडी, जांभुळवाडी आणि शिवपुरी व कामेरीचा पश्चिम भाग ओलिताखाली येणार आहे.

वाकुर्डे योजनेच्या बंदिस्त पाईपमधून डिसेंबर अखेर पाणी मिळेल-माजी आमदार शिवाजीराव नाईक | Water will be available from closed pipes of Wakurde scheme by the end of December: Former MLA Shivajirao Naik 

याच योजनेतील रेड पासून पाईप लाईनचा दुसरा फाटा कापरी, कार्वे, ढगेवाडी, ऐतवडे बुद्रुक, वशी इटकरे पर्यंत तसेच कापरी पासून इंग्रुल चिखलवाडी, फकिर वाडी पर्यंतचे बंद पाईप लाईनचे  महत्वपूर्ण काम अंतिम टप्प्यात आले आहे. याचा मोठा फायदा शिराळासह रेड, खेड येथील शेतकऱ्यांना होणार आहे. ढगेवाडीच्या पुढे जाक्राईवाडी, वशी, इटकरे वरून कामेरीच्या शिवारात जाणाऱ्या पाईप लाईनचे काम ढगेवाडी ते जक्राईवाडी दरम्यान वन विभाग हद्दीतून जाते. ते खोळंबलेले कामास वन विभागकडून मान्यता घेऊन नजीकच्या काळात पूर्ण करण्यात येणार आहे.

वाकुर्डे योजनेच्या बंदिस्त पाईपमधून डिसेंबर अखेर पाणी मिळेल-माजी आमदार शिवाजीराव नाईक | Water will be available from closed pipes of Wakurde scheme by the end of December: Former MLA Shivajirao Naik 

त्याचबरोबर मोरणा नदीच्या पश्चिम बाजूच्या क्षेत्रासाठी असणाऱ्या वाकुर्डे बुद्रुक पासून १० किलोमिटर मधील कॅनॉल चे काम वाकुर्डे खुर्द पर्यंत पूर्णत्वास आले आहे. यापुढील उर्वरित वाकुर्डे खुर्द ते बिऊर पर्यंत ९ किलोमिटरचे काम अल्पावधीत सुरू होऊन बंदिस्त पाईप लाईनने पाणी पुरवठा करणे साठी एप्रिल अखेर पर्यंत करण्याचे प्रस्तावित आहे. तसेच वाकुर्डे योजना भाग १ मधील टप्पा क्रमांक १ मधूनच हातेगाव तलावातून हातेगाव, खिरवडे, अंबाबाईवाडी, आटुगडेवाडी, गवळेवाडी पर्यंत आणि तसेच गवळवाडी पासून येळापुरच्या शिवारात पाणी देण्यासाठी मेणी नाल्याच्या पश्चिमेकडून येळापुर पर्यंत बंदिस्त पाईप लाईन ने पाणी देण्याचे नियोजन आहे. याही कामास नजीकच्या काळात सुरवात होईल. त्यामुळे योजनेतील भाग १ मधील टप्पा १ व २ च्या कार्य क्षेत्रातील योजना लवकरच कार्यान्वित होऊन जिरायत शेती ओलिताखाली येऊन बागायत होणार आहे.

वाकुर्डे योजनेच्या बंदिस्त पाईपमधून डिसेंबर अखेर पाणी मिळेल-माजी आमदार शिवाजीराव नाईक | Water will be available from closed pipes of Wakurde scheme by the end of December: Former MLA Shivajirao Naik 

या योजनेतील शिराळा तालुक्याच्या उत्तर विभागातील टाकवे, पाचूंब्री, बांबवडे व वाळवा तालुक्यातील काही गावांना पाणी देण्याचे निश्चित झाल्याने टप्पा क्रमांक ३ ला मान्यता मिळाली आहे. यामध्ये करमजाई तलावातून पाणी लिफ्टने उचलून बोगद्यातून पुढे पणुंब्रे तर्फ शिराळा येथे आल्यानंतर त्यातील एक फाटा शिवरवाडी, भैरेवाडी, टाकवे, बांबवडे, पुदेवाडी वरून करमाळे परिसरात तसेच दुसरा फाटा पणुंब्रे तर्फ शिराळा येथून घागरेवाडी, टाकवेचा काही भाग पुढे पाचुंब्रीला वळसा घालून वाटेगावच्या शिवे पर्यंत पाणी देण्यासाठी बंदिस्त पाईप लाईन कामाला मंजुरी देण्यात आली आहे. टप्पा क्रमांक ३ मधून पाणी उचलल्यानंतर या बंदिस्त पाईप लाईनला दक्षिण बाजूला फाटा देऊन शिरशी, आंबेवाडी, निगडी, औंढी, भटवाडी पर्यंत पाणी देण्यात येईल. त्यामुळे टप्पा क्रमांक १,२ व ३ मधून बहुतांशी क्षेत्र नव्याने ओलिताखाली येणार आहे. या महत्वपूर्ण योजनेसाठी चांदोली धरणाच्या वारणा डाव्या कालव्यामधून पाणी मिळणार असल्याने या कालव्याची शून्य ते २६ किलोमिटर मधील दुरुस्ती होणे अगत्याचे आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाचे वतीने हि दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत.

वाकुर्डे योजनेच्या बंदिस्त पाईपमधून डिसेंबर अखेर पाणी मिळेल-माजी आमदार शिवाजीराव नाईक | Water will be available from closed pipes of Wakurde scheme by the end of December: Former MLA Shivajirao Naik 

वाकुर्डे योजनेबरोबरच शिराळा तालुक्यातील वारणा नदीकाठच्या गावांना पाणी देण्यासाठी २६ किलोमीटरच्या पुढे चिकुर्डे गावापर्यंत डाव्या कालव्याचे बहुतांशी अपूर्ण काम लवकरात लवकर पूर्ण करून सदरचा डावा कालवा प्रवाही करणेसाठी शासनाची विशेष बाब म्हणून मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे वारणा काठच्या शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. नदीतून विद्युत पंपाने पाणी उचलण्यासाठी येणारा वीज बिल खर्च, योजनांची दुरुस्ती व देखभाली साठी होणारा खर्च वाचणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

वाकुर्डे योजनेच्या बंदिस्त पाईपमधून डिसेंबर अखेर पाणी मिळेल-माजी आमदार शिवाजीराव नाईक | Water will be available from closed pipes of Wakurde scheme by the end of December: Former MLA Shivajirao Naik 

Post a Comment

0 Comments