शिराळा : येथे वारणा प्रसाद विद्यालयात १९७६ साली शिकविण्यास असणारे गुरु, दहावीत असणारी विद्यार्थी यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. तब्बल ४५ वर्षानी गुरु -शिष्यांच्या भेटीने गुरु-शिष्यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिल्याने अनेकांच्या आनंदाश्रूंनी डोळ्याच्या कडा ओलावल्या होत्या.
शैक्षणिक प्रवाहाचे अनेक टप्पे पार करत प्रत्येकजण शाळा,काँलेजचे दिवस संपले की आपापल्या करिअरच्या वेगवेगळ्या मार्गानी नोकरी,कामधंद्याच्या निमित्ताने महाराष्ट्रभर विखुरलेले असतात. अशा महाराष्ट्रभर विखुरलेल्या गोगाक, मुंबई, गुजरात येथील माजी विद्यार्थी एकत्र येत त्यांनी बिळाशीत 'गुरु-शिष्याचा' नात्यातील ऋणानुबंधाचा स्नेहमेळावा आयोजित केला. गुरुंनीही शिष्यांच्या नात्यांना नव्याने उजाळा देत एकमेकांशी संवाद साधत एकमेकांप्रति 'गुरु-शिष्याच्या' नात्याची वीण चांगलीच घट्ट केली. 'गुरुंप्रति' असणारा आदर आजही माजी विद्यार्थ्यांमध्ये कायम असल्याचे पाहूण 'गुरुही' गहिवरले. त्यांनीही आपल्या मनोगतातून जुन्या आठवणींना मोकळी वाट करुन दिली.
व्ही.जी.हसबनीस,एस.व्ही. कुलकर्णी, व्हि.के.कुलकर्णी आदींसह अनेक काही सेवेत असणारे बहुतांशी सेवानिवृत्त झालेले गुरू कार्यक्रमाला उपस्थित होते. सेवानिवृत्त जेष्ठ गुरु श्री हसबनीस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. एन.के.पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती होती. श्री हसबनीस, एस.व्ही.कुलकर्णी, डॉ. श्री.पाटील, माजी विद्यार्थी मल्ल राजेंद्र साळुंखे आदींसह अनेक गुरु, माजी विद्यार्थी यांनी मनोगते मांडली. जी.के.पाटील, भानूदास साळुंखे, दिलीप पोतदार, दिनकर पाटील, सुनिल पाटील आदिंसह माजी विद्यार्थी स्नेंहिंनी कार्यक्रमाचे उत्कृष्ठ संयोजन केले होते.
0 Comments