शिराळा : ‘विश्वास’ कारखान्यात 2020-21 हंगामात गाळपासाठी आलेल्या ऊसाला अंतिम हत्प्त्यापोटी 225 रुपये प्रतिटन प्रमाणे उद्या (ता. 21) बँकेकडे वर्ग होतील, अशी माहिती अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली. 25 ऑक्टोबरपासून 2021-22 च्या गळीत हंगामास सुरूवात होईल. 2020-21 हंगामातील गाळप ऊसापोटी सर्व ऊस पुरवठादारांना प्रतिटन अर्धा किलो साखर देणार आसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आमदार नाईक म्हणाले, विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याने जास्तीत जास्त ऊस दर देण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. 2020-21 च्या गळीत हंगामातील कारखान्याची आधारभूत किंमत 2975 इतकी होती. त्यानुसार पहिल्या हप्त्यापेटी 2500 रुपये, दुसरा हप्ता 250 रुपये आदा केला आहे. आता 225 वर्ग होत आहेत. त्यामुळे बॉयलर अग्निप्रदीप समारंभात जाहिर केल्याप्रमाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली आहे. याशिवाय या हंगामात ज्या ऊस उत्पादकांनी कारखान्याकडे गाळपासाठी ऊस पाठवला होता, त्यांना प्रतिटन अर्धा किलो साखर दिली जाईल. या साखरेची कुपन शेतकऱ्यांनी आपल्या विभागातील गट ऑफिसमधून घ्यावीत.
ते म्हणाले, कोरोना माहामारीने सर्वांचे कंबरडे मोडले असताना त्यातच महापुराने शेतीचे अतोनात नुकसाने केले. वारणा, मोरणा, कडवी नदीकाठावरील ऊसाचे यामध्ये मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे हा गळीत हंगाम थोडा अडचणीचा आहे. तरीही न डगमगता सभासद व ऊस उत्पादकांचा विश्वास, कामगारांची साथ या जोरावर या अडचणीवरही मात करू. नोंदीनुसार तोडणी कार्यक्रमाची अंमलबाजवणी करून ऊस वेळेत गाळपासाठी आणला जाईल. सभासद, ऊस उत्पादकांनी जो आजवर संचालक मंडळावर विश्वास दाखला आहे, तो तसाच कायम ठेवेवा. त्याला पात्र राहून आगामी काळातही अशीच शेतकऱ्यांना अपेक्षीत प्रगती साधली जाईल. ऊस उत्पादकांनी पिकवलेला सर्व ऊसाची नोंद कारखान्याकडे करावी, ही विनंती. यावेळी कार्यकारी संचालक राम पाटील व मुख्य लेखापाल भानुदास पाटील उपस्थित होते.
0 Comments