BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना सानुग्रह अनुदान वितरीत करण्याचा निर्णय |The decision to distribute sanugrah grants to the heirs of those who died due to corona

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत होणार कार्यक्रमाची अंमलबजावणी

सांगली दि. 19 (जि.मा.का.) : मा. सर्वोच्च न्यायालयाने दि. 30 जून 2021 रोजी दिलेल्या निर्णयानुसार राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि महाराष्ट्र शासन यांनी कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना 50 हजार रूपये सानुग्रह अनुदान वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. 

अनुदान वितरीत करण्यासंबंधीची सर्व प्रक्रिया ही ऑनलाईन असणार असून ती साधारणपणे येत्या दोन आठवड्यांमध्ये प्रत्येक जिल्ह्याला कळविली जाणार आहे. जिल्हा पातळीवर प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या कार्यक्रमाची अंमलबजावणी करणारी यंत्रणा असणार आहे. प्राधिकरणाचे पदसिध्द अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी या सर्व अंमलबजावणीचे प्रमुख असणार आहेत. 

कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना  सानुग्रह अनुदान वितरीत करण्याचा निर्णय |The decision to distribute sanugrah grants to the heirs of those who died due to corona

सांगली जिल्ह्यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय विजयनगर, सांगली मिरज रोड सांगली, दुरध्वनी क्रमांक – 0233-2600500, टोल फ्री क्रमांक – 1077.

 अनुदान वितरणाबाबत महाराष्ट्र शासनाकडून कार्यप्रणाली प्राप्त होताच कळविण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना  सानुग्रह अनुदान वितरीत करण्याचा निर्णय |The decision to distribute sanugrah grants to the heirs of those who died due to corona

Post a Comment

0 Comments