"प्रतिभा" | संपन्न नगराध्यक्षा | "Talent" | thriving |mayor
"प्रतिभा" | संपन्न नगराध्यक्षा | "Talent" | thriving |mayor
शिराळा: कोणताही राजकीय वारसा नसलेल्या घराण्यातील प्रतिभा पवार आज शिराळा नगरपंचायतच्या नगराध्यक्षा झाल्या आहेत. त्यांना नाईक कुटुंबियांशी असणाऱ्या एकनिष्ठतेचे फळ मिळाले हे निश्चित. अशा या प्रतिभा संपन्न असणाऱ्या पवार घराण्याची प्रतिभा आज नगराध्यक्षा झाल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
"प्रतिभा" | संपन्न नगराध्यक्षा | "Talent" | thriving |mayor
सौ. प्रतिभा बजरंग पवार ह्या शिराळा नगरपंचायतच्या २०१७ च्या निवडणुकीत प्रभाग ७ मधून राष्ट्रवादी पक्षाकडून निवडून आल्या. आमदार मानसिंगराव नाईक, विराज नाईक, सम्राटसिंह नाईक,सौ.सुनिता नाईक यांचे नेतृत्व मानून त्यांचे चिरंजीव प्रमोद हे गेल्या अनेक वर्षाा पासून राजकारणात सक्रिय आहेत. तसं पहिले तर या घराण्याला कोणताही राजकीय वारसा नाही.पण बजरंग उर्फ लाला पवार हे शिराळा येथील उत्कृष्ट फोटोग्राफर म्हणून प्रसिद्ध आहेत.त्यांनी आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने फिरत असताना सर्वांशी आपुलकीचे नाते निर्माण केले. त्यातून त्यांची समाजातील प्रत्येक घटकाशी नाळ जुळली. आपण कधी राजकारण करू हे त्यांच्या मनात ही आले नाही. परंतु त्यांचे चिरंजीव प्रमोद यांनी हळूहळू आपल्याकडे असणाऱ्या संघटन कौशल्यातून आपल्या मित्र परिवारात सामाजिक कार्यातून आपले वेगळेस्थान निर्माण केले. त्यातूनच त्यांची हळूहळू राजकीय वाटचाल कधी सुरु झाली हे त्यांना कळलेच नाही.
"प्रतिभा" | संपन्न नगराध्यक्षा | "Talent" | thriving |mayor
त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेवून मराठा आरक्षण समन्वय समिती व टायगर ग्रुपचे तालुकाध्यक्ष पद मिळाले. या पवार घराण्याकडे असलेले नेतृत्व गुण आमदार मानसिंगराव नाईक यांनी हेरले. त्यांना नगरपंचायतची उमेदवारी जाहीर केली. आपल्याला मिळालेल्या संधीचे सोनं करण्याचा चंग पवार कुटुंबीयांनी बांधला. गट तट न पाहता जोमाने काम करत वडील बजरंग उर्फ लालासाहेब पवार यांच्या सहकार्याने प्रमोद यांनी मोठ्या संघर्षातून आपल्या आईला निवडून आणले. प्रतिभा पवार नगरसेविका बनल्या. त्यांतर आपले सहकरी व वरिष्ठ पदाधिकारी यांच्या सलोख्याने बांधकाम सभापतीपदी संधी मिळाली. आणि आज सौ. प्रतिभा पवार ह्या शिराळच्या चौथ्या नगराध्यक्षा म्हणून विराजमान झाल्या आहेत.
"प्रतिभा" | संपन्न नगराध्यक्षा | "Talent" | thriving |mayor
0 Comments