BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

ऊस उत्पादक शेतकऱ्यांची |आर्थिक पिळवणूक | होणार नाही याची दक्षता घ्या | - |आयुक्त (साखर) शेखर गायकवाड | Take care that there will be no economic extortion of sugarcane growers - Commissioner (Sugar) Shekhar Gaikwad

वाचा-👉गाडीची चोरी...सोशल मिडीयावर पोष्ट ...

ऊस उत्पादक शेतकऱ्यांची |आर्थिक पिळवणूक | होणार नाही याची दक्षता  घ्या | - |आयुक्त (साखर) शेखर गायकवाड Take care that there will be no economic extortion of sugarcane growers - Commissioner (Sugar) Shekhar Gaikwad 

कारखान्यांनी तक्रारनिवारण अधिकारी म्हणून शेती विभागाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करावी

ऊस उत्पादक शेतकऱ्यांची |आर्थिक पिळवणूक | होणार नाही याची दक्षता  घ्या | - |आयुक्त (साखर) शेखर गायकवाड Take care that there will be no economic extortion of sugarcane growers - Commissioner (Sugar) Shekhar Gaikwad 

सांगली, दि. 12, (जि. मा. का.) : ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस तोडणी मजूर, मुकादम, वाहतूकदार यांच्याकडून आर्थिक पिळवणूक होत असल्याची एकही तक्रार चालू गाळप हंगामात येणार नाही याची कार्यकारी संचालक व खाजगी साखर कारखान्यांच्या जनरल मॅनेजर / मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी   दक्षता घ्यावी, असे आवाहन आयुक्त (साखर) शेखर गायकवाड यांनी केले आहे.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस तोडणी मजूर, मुकादम, वाहतूकदार यांच्याकडून आर्थिक पिळवणूक होत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यावर चौकशी करून तक्रारीचे वेळीच निराकरण करावे. तक्रारीमध्ये तथ्य आढळून आल्यास सदरची रक्कम मजूर, मुकादम, वाहतूक कंत्राटदार यांच्या बिलातून वसूल करून संबंधीत शेतकऱ्यास अदा करावी. याची जबाबदारी तक्रारनिवारण अधिकारी यांच्यावर सोपवावी, असे आवाहनही आयुक्त (साखर) शेखर गायकवाड यांनी केले आहे.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांची |आर्थिक पिळवणूक | होणार नाही याची दक्षता  घ्या | - |आयुक्त (साखर) शेखर गायकवाड Take care that there will be no economic extortion of sugarcane growers - Commissioner (Sugar) Shekhar Gaikwad 

ऊस तोडी मजूर व मुकादम यांच्याकडून ऊस तोडणी करताना, ऊस पिक चांगले नाही, ऊस खराब आहे, ऊस पडलेला आहे, ऊस क्षेत्र अडचणीचे आहे, तोडणी करणे परवडत नाही अशी विविध कारणे सांगून ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांकडून पैशांची मागणी केली जाते. ऊस तोडणी मजूर व मुकादम यांच्या मागणीप्रमाणे शेतकऱ्यांनी पैसे दिले नाही तर ऊस तोडणीस टाळाटाळ केली जाते. अशाप्रकारे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस तोडणी मजूर, मुकादम व ऊस वाहनचालक यांच्याकडून आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी साखर आयुक्तालयास प्राप्त होत आहेत. राज्यात चालू 2021-22 गाळप हंगामात उपलब्ध असलेला सर्व ऊस सर्वसाधारणपणे 145-150 दिवसांत गाळप होईल एवढी साखर कारखान्यांची स्थापित गाळप क्षमता असल्याने व इथॅनॉल उत्पादनाकरीता साखर वळविली जाणार असल्याने शेतकऱ्यांनी आपला ऊस गाळप होईल की नाही याबाबत शंका घेऊ नये. प्रादेशिक सह संचालक (साखर) व साखर आयुक्त कार्यालयाच्या स्तरावरही ऊस गाळपाच्या संदर्भात नियमितपणे आढावा घेतला जाणार आहे. 

ऊस उत्पादक शेतकऱ्यांची |आर्थिक पिळवणूक | होणार नाही याची दक्षता  घ्या | - |आयुक्त (साखर) शेखर गायकवाड Take care that there will be no economic extortion of sugarcane growers - Commissioner (Sugar) Shekhar Gaikwad 

शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक रोखण्यासाठी सर्व कारखान्यांनी जाहीर प्रकटन करून अशा प्रकरणातील गैरव्यवहाराला आळा बसेल असे पाहावे. तसेच कारखान्याच्यावतीने तक्रार करण्यासाठी मोबाईल फोन / व्हॉटसॅप क्रमांक जारी करावा व याबाबतची माहिती शेतकऱ्यांना होण्याकरीता प्रसिध्दी द्यावी. सर्व सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालक व खाजगी साखर कारखान्यांच्या जनरल मॅनेजर / मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी, अशा स्वरूपाच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी कारखान्यांनी तक्रारनिवारण अधिकारी म्हणून शेती विभागाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. तक्रार निवारण अधिकारी यांचे नाव, संपर्क मोबाईल नंबर यांची माहिती कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील ऊस तोडणी होत असलेल्या गावांमध्ये दर्शनी ठिकाणी व ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर प्रसिध्द करावी. तसेच प्रसिध्दी माध्यमांव्दारे व्यापक स्वरूपात प्रसिध्दी करावी. शेतकऱ्यांनी लेखी स्वरूपात अशी तक्रार साखर कारखान्याच्या शेती अधिकारी यांच्याकडे घटना घडल्यावर लगेच करावी. तसेच तक्रार करण्यासाठी शेतकऱ्यांनी साखर आयुक्तालयाच्या shetkari.madat@gmail.com या ईमेलचा वापर करावा. तक्रारीमध्ये मजूर, मुकादम, वाहतूकदार यांचे नाव व वाहन क्रमांक नमुद करावा, असे साखर आयुक्तालयाच्या वतीने प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांची |आर्थिक पिळवणूक | होणार नाही याची दक्षता  घ्या | - |आयुक्त (साखर) शेखर गायकवाड Take care that there will be no economic extortion of sugarcane growers - Commissioner (Sugar) Shekhar Gaikwad 

Post a Comment

0 Comments