शिराळा: कदमवाडी ( ता.शिराळा) येथील सुनिल सुभाष कदम ( वय २१) या युवकाने मोकळ्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली.
सदर घटना आज रविवार रोजी सायंकाळी ६ च्या पूर्वी घडली. याबाबत संदीप कदम यांनी शिराळा पोलिसात वर्दी दिली आहे.
शिराळा पोलीसातून समजलेली माहिती अशी, सुनील हा शनिवारी मुंबईला जातो म्हणून घरातून बाहेर पडला होता. मात्र तो मुंबईला न जाता त्याने चुलत भाऊ प्रकाश रामचंद्र कदम यांचे मोकळ्या घरा मध्ये जाऊन आत्महत्या केली. आज रविवार रोजी शेजारचे घर उघडे आहे हे पाहून आत गेले असता सदर घटना लक्षात आली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.त्याचे पश्चात आई , वडील , भाऊ असा परिवार आहे. पुढील तपास हवालदार डी. एस. खोमणे हे करीत आहेत.
0 Comments