लोकांशी | आपुलकीचे व विश्वासाचे |असणारे नाते |आणखी दृढ करा-|रणधीर नाईक | Strengthen the relationship of affection and trust with people - Randhir Naik

शिराळा: व्यापारी दृष्टीकोन आणि आर्थिक प्राप्ती या दोन गोष्टींचा विचार करून पतसंस्थांचा शाखा विस्तार करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन माजी जिल्हापरिषद सदस्य रणधीर नाईक यांनी केले.
शिराळा येथे जनउत्कर्ष पतसंस्थेला दिलेल्या सदिच्छा भेटी प्रसंगी बोलत होते. यावेळी नाईक म्हणाले, पतसंस्थांना आता अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या अडचणींच्या काळात आपल्या पारदर्शक व्यवहाराने व काटेकोर नियोजनामुळे जनउत्कर्ष संस्थेने केलेली प्रगती कौतुकास्पद आहे. संस्थेने वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांना प्रधान्य देऊन सामाजिक बांधिलकी जोपासत लोकांशी आपुलकीचे व विश्वासाचे असणारे नाते आणखी दृढ करावे .
लोकांशी | आपुलकीचे व विश्वासाचे |असणारे नाते |आणखी दृढ करा-|रणधीर नाईक | Strengthen the relationship of affection and trust with people - Randhir Naik
स्वागत व प्रास्ताविक संस्थापक विजयसिंग खांडेकर यांनी केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मारुती शिंदे,संचालक शांताराम जाधव,,के.वाय. भाष्टे, पोपट मस्के,संजय गुरव,आनंदराव जाधव, सदाशिव गायकवाड, तात्यासो धुमाळ, तानाजी आटूगडे, जनार्धन कांबळे, शिवाजीराव चौगुले,शोभा पाटील उपस्थित होते.आभार ,के.वाय. भाष्टे यांनी मानले.

0 Comments