BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

औषध फवारणीसाठी लवकरच ड्रोन प्रात्यक्षिक- विराज नाईक |Soon drone demonstration for drug spraying- Viraj Naik

 औषध फवारणीसाठी |लवकरच ड्रोन प्रात्यक्षिक| - विराज नाईक |Soon drone demonstration | for drug spraying| - Viraj Naik

शिराळा  : आगामी काळामध्ये शेतकऱ्यांना फवारणी करतेवेळीच्या अडचणी समजून घेऊन लवकर ड्रोनचे प्रात्यक्षिक आयोजित केले जाणार आहे, असे प्रतिपादन युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांनी केले.

 औषध फवारणीसाठी |लवकरच ड्रोन प्रात्यक्षिक| - विराज नाईक |Soon drone demonstration | for drug spraying| - Viraj Naik 

फोटोवर क्लिक👇👇करून वाचा 

पाडळी (ता. शिराळा) येथील दत्त मंदिरात विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्यामार्फत ‘‘आधुनिक ऊस उत्पादन तंत्रज्ञान’’ या विषयावर ऊस पीक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कीटक जीवशास्त्रज्ञ डॉ. अंकुश चोरमुले प्रमुख मार्गदर्शक होते. 

 औषध फवारणीसाठी |लवकरच ड्रोन प्रात्यक्षिक| - विराज नाईक |Soon drone demonstration | for drug spraying| - Viraj Naik

ते म्हणाले विश्वास कारखान्यामार्फत आपल्या भागातील शेतकऱ्यांना आधुनिक ऊस उत्पादन तंत्रज्ञान अवगत व्हावे यासाठी तज्ञ मार्गदर्शक यांना बोलावून शेतकऱ्यांसाठी परिसंवादाचे गावोगाव आयोजन केले जात आहे. अध्यक्ष, आमदार मानसिंग नाईक यांनी कारखान्याची सूत्रे हाती घेतल्यापासून ‘विश्वास’ने सतत प्रगतीची नवी शिखरे गाठत चालला आहे. सभासद, ऊस उत्पादक व कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी संचालक मंडळावर दाखवलेला विश्वासामुळे एवढी प्रगती साधता आली आहे. 

 औषध फवारणीसाठी |लवकरच ड्रोन प्रात्यक्षिक| - विराज नाईक |Soon drone demonstration | for drug spraying| - Viraj Naik

किटक शास्त्रज्ञ डॉ. चोरमुले म्हणाले, शिराळा तालुका अतिपावसाचा असल्याने जमिनीमधून अन्नद्रव्याचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होतो. त्यामुळे पाचट कुजवणे, शेणखत, कंपोस्ट खत, हिरवळीची खते वापरणे गरजेचे आहे. जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढल्याशिवाय उत्पन्न वाढणार नाही. जमीनीच्या आरोग्य तपासण्यासाठी माती परीक्षण गरजेचे आहे. ऊस पिकासाठी रासायनिक खते देताना ते फेकून न देता मातीआड करून द्यावीत. यामुळे खताची कार्यक्षमता वाढते. ऊस पिकावर ‘पोक्का बोन्ग’ या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत असताना दिसून येत आहे. यासाठी शिफारशीत बुरशीनाशकांच्या वापर योग्य प्रमाणात करावा. रासायनिक खतांचा सोबत जिवाणू खत वापरणे काळाची गरज बनलेली आहे.

 औषध फवारणीसाठी |लवकरच ड्रोन प्रात्यक्षिक| - विराज नाईक |Soon drone demonstration | for drug spraying| - Viraj Naik

प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक राम पाटील यांनी केले. यावेळी अशोक पाटील दाजी उपाध्यक्ष विराज इंडस्ट्रीज लिमिटेड बाळासाहेब पाटील संचालक विश्वासराव नाईक कारखाना विश्वासच्या कामगार संघटनेचे उपाध्यक्ष विजय पाटील, मुख्य शेती अधिकारी व्ही. एम. चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने ऊस उत्पादक, सभासद उपस्थित होते. आभार चंद्रकांत पाटील यांनी केले.

 औषध फवारणीसाठी |लवकरच ड्रोन प्रात्यक्षिक| - विराज नाईक |Soon drone demonstration | for drug spraying| - Viraj Naik

Post a Comment

0 Comments