शुक्रवारी | साई चॅरिटेबल ट्रस्ट |मोफत |नेत्र |तपासणी शिबीर| Sai Charitable Trust | Free Eye Checkup Camp | on Friday
शिराळा: येथील साई चॅरिटेबल ट्रस्ट संचलित साई हॉस्पिटल व नॅब नेत्र रूग्णालय मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार (ता. १५) रोजी मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजित केले असल्याची माहिती डॉ. शैलेश माने यांनी दिली.
शुक्रवारी | साई चॅरिटेबल ट्रस्ट |मोफत |नेत्र |तपासणी शिबीर| Sai Charitable Trust | Free Eye Checkup Camp | on Friday
यावेळी ते म्हणाले, शिबीराचे उदघाटन आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कोरीनाच्या अगोदर साई हॉस्पिटलमध्ये प्रत्येक आठवड्याला मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात येत होते. परंतु कोरोनामुळे दीड वर्षे शिबीर घेता आले नाही. या मोफत शिबीरामध्ये मोफत नेत्र तपासणी होणार आहे. अत्याधुनिक फेको मशिनद्वारे बिन टाक्याच्या ऑपरेशनची सोय, मिरज येथे सवलतीच्या दरात नेत्र शस्त्रक्रिया, जाण्या येण्याची व जेवणाची मोफत सोय, मोतीबिंदू, काचबिंदू, लासरू, डोळ्यांची प्लास्टिक सर्जरी, डेळ्यांच्या पडद्याचे विकार, डोळ्याचा तिरळेपणा तपासणी व उपचार, डोळ्यांचे नंबर काढून सवलतीच्या दरात चष्म्याची सोय केली जाणार आहे.
शुक्रवारी | साई चॅरिटेबल ट्रस्ट |मोफत |नेत्र |तपासणी शिबीर| Sai Charitable Trust | Free Eye Checkup Camp | on Friday
या शिबीरासाठी साई चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. बी. बी. माने, डॉ. शिला बी. माने, डॉ. योगिता माने यांची प्रमुख उपस्थिती आहे. हे शिबीर शिराळा येथील साई हॉस्पिटलमध्ये आयोजित करण्यात आले आहे.
शुक्रवारी | साई चॅरिटेबल ट्रस्ट |मोफत |नेत्र |तपासणी शिबीर| Sai Charitable Trust | Free Eye Checkup Camp | on Friday
0 Comments