शिराळा: केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तू व इंधनावर लावलेले विविध कर कमी करावे या मागणीसाठी शिराळा विधानसभा मतदार संघ युवासेना यांच्यावतीने तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून निषेध व्यक्त केला.
प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा
या मोर्च्याचे नेतृत्व युवासेना उपजिल्हाप्रमुख स्वप्निल निकम यांनी केले. केंद्र सरकारचा निषेध करत हा मोर्चा कृषी उत्पन्न बाजार समिती ते शिराळा तहसील कार्यालया पर्यंत लोकशाही मार्गाने मोर्चा काढण्यात आला.
यावेळी तहसीलदारसो गणेश शिंदे यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनात म्हटले आहे, केंद्र सरकारने,पेट्रोल,डिझेल, गॅस चे दर वाढवून महागाईचा भडका उडविला आहे. या महागाईमुळे लोकांना जगणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे ही महागाई कमी करावी.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख संतोष हिरुगडे, युवासेना उपजिल्हा प्रमुख स्वप्निल निकम,युवासेना जिल्हा समन्वयक, प्रमोद पाटील ,सौरभ खोत,अनिल देवळेकर युवासेना तालुकाप्रमुख, अजिंक्य पाटील, शहरप्रमुख सुरेश पिसाळ,विनायक निकम,प्रदिप यादव,निवास कदम,हर्षद खोत,आशिष दळवी,मनोज कदम,बबलु निकम,प्रविण गायकवाड,सोहेल मुल्ला,सोमराज सुतार,प्रसाद पाटील,मयुर पाटील,जय पाटील,अविनाश पाटील उपस्थित होते.
0 Comments