महिला राष्ट्रवादी काँग्रेस | व शिराळा सखी मंच | मार्फत नवदुर्गा सन्मान सोहळ्याचे आयोजन| Organizing Navdurga Sanman Sohala | through | Mahila NCP and | Shirala Sakhi Manch
महिला राष्ट्रवादी काँग्रेस | व शिराळा सखी मंच | मार्फत नवदुर्गा सन्मान सोहळ्याचे आयोजन| Organizing Navdurga Sanman Sohala | through | Mahila NCP and | Shirala Sakhi Manch
हे ही वाचा👉 आरवचा नरबळी नाही बापचं बनला कर्दनकाळ
शिराळा (प्रतिनिधी) : महिला राष्ट्रवादी काँग्रेस व शिराळा सखी मंच मार्फत नवदुर्गा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ही माहिती महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष साधना पाटील यांनी दिली.
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
त्या म्हणाल्या, नवदुर्गा सत्कार समारंभ शनिवारी ता. ९ ऑक्टोंबरला दत्त मंदिरात सकाळी अकरा वाजता सुरू होईल. आमदार मानसिंगराव नाईक व सौ. सुनीतादेवी नाईक प्रमुख उपस्थित असतील. दरवर्षी नवरात्री कालावधीत नवदुर्गा सन्मान सोहळ्याचे आयोजन केले जाते. आतापर्यंत शिराळा शहरातील लहान मोठे व्यवसाय यशस्वीरित्या सांभाळणाऱ्या महिलांचे सत्कार, नगरपंचायतीकडील महिला सफाई कर्मचाऱ्यांतचे या ही वर्षी ती प्रथा चालू राहावी म्हणून आपल्या तालुक्यातील होतकरू व प्रेरणादायी प्रवास असणाऱ्या महिलांचे सत्कार घेण्याचे नियोजन केले आहे.
हे ही वाचा👉शेतात गव्याने केलेल्या हल्ल्यात दोघे जखमी
सखी मंच महिलांचा असल्याने समाजातील महिलांचा सन्मान केल्याने तो समाजापुढे एक आदर्श असेल. महिलांना प्रोत्साहन देणारा ठरेल. म्हणून अतिशय खडतर परिस्थितीत केवळ जिद्द व चिकाटीच्या जोरावर सर्वांना अभिमान वाटावा अशी असामान्य कामगिरीचा आणि कर्तुत्व करणाऱ्या महिलांचा प्रतीकात्मक गौरव करणार आहे. शिराळा व परिसरातील महिलांनी या कार्यक्रमास आर्वजून उपस्थित राहावे.
महिला राष्ट्रवादी काँग्रेस | व शिराळा सखी मंच | मार्फत नवदुर्गा सन्मान सोहळ्याचे आयोजन| Organizing Navdurga Sanman Sohala | through | Mahila NCP and | Shirala Sakhi Manch
सत्कारमूर्ती असे : शिराळा येथील सोनाली नवांगुळ या अपंग असून त्यांना केलेल्या अनुवाद लेखनाला साहित्य अकादमी पुरस्कार जाहिर झाला आहे. नेर्ले, ता. वाळवा येथील ज्योत्स्ना पाटील या प्रसिद्ध स्रीरोगतज्ञ व वक्त्या आहेत. शिराळा येथील महाजन कन्सर्सच्या मालक सुखदा महाजन यांची ग्राहक संरक्षण परिषद जिल्हा पातळीवर नियुक्ती व सातत्याने सामाजिक कार्यात सहभाग घेतला आहे. बिऊर, ता. शिराळा येथील वर्षाताई दशवंत या शिराळा तालुक्यात डोंगराळ भागात स्वतः दूधगाडी चालवून दूध संकलन करून पतीच्या व्यवसायात मदत करता. खेड, ता. शिराळा येथील नीलम पाटील या उपविभागीय अधिकारी म्हणून पोलिस दलात कार्यरत व दहशतवादी कारवाई मध्ये सहभाग राहीला आहे. शिराळा येथील स्वाती भस्मे यांनी अपंगत्वावर मात करत राज्यस्तरीय महिला क्रिकेट टीम स्थान मिळविले आहे. जांभळेवाडी, ता. शिराळा येथील तेजस्विनी पवार यांनी जन्मत अंधत्व असताना त्यांनी शासकीय लिपिक पदापर्यंत झेप घेतली आहे. ढोलेवाडी, ता. शिराळा येथील निशा पवार या युवा उद्योजक असून दर्जेदार गांडूळ खत निर्मितीचा उद्योग यशस्वी सांभाळतात. इटकरे, ता. वाळवा येथील सुजाता पवार या उद्योजक असून जान्हवी मसाले या नावाने बनवलेले विविध मसाले अमॅझॉनवर विक्री होतात. शिराळा येथील सावित्रीबाई कदम यांना संतोष महाडिक कुटुंबाने आई म्हणून दत्तक घेतले आहे. या आईने 15 वर्षांपासून जबाबदारीने व प्रेमाने महाडीक यांचे कुटुंब व घर सांभाळले आहे. पेठ, ता. वाळवा कांताताई पिसे यांनी पतीच्या निधनानंतर घरीच पापड उत्पादन व्यवसाय यशस्वीरित्या करून कुटुंबाचा चरितार्थ सांभाळला आहे. यांचा यथोचित सन्मान होणार आहे.
महिला राष्ट्रवादी काँग्रेस | व शिराळा सखी मंच | मार्फत नवदुर्गा सन्मान सोहळ्याचे आयोजन| Organizing Navdurga Sanman Sohala | through | Mahila NCP and | Shirala Sakhi Manch
७ ऑक्टोबर | दिन विशेष |October 7 | is a special day|
७ ऑक्टोबर | दिन विशेष |October 7 | is a special day|
१) मादाम मेरी क्युरी जन्मदिन ( १८६७ )( Madame Marie Curie Birthday (1867)
२) केशवसुतांचा जन्मदिन ( १८६६ )(Keshavsutan's Birthday (1866)
३) शीख धर्मगुरु गोविंदसिंग स्मृतिदिन ( १७०८ )( Sikh Guru Gobind Singh Memorial Day (1708)
४)१९१९ महात्मा गांधीजींनी नवजीवन हे वृत्तपत्र सुरु केले.(1919 Mahatma Gandhi started the newspaper Navjivan.)
५ )२००१ सप्टेंबर ११ च्या हल्ल्यात प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला चढविला.(The United States invaded Afghanistan in response to the September 11, 2001 attacks.)
६)२००२ सलमान खान यांना वांद्रे पोलिसात अटक. (2002 Salman Khan arrested by Bandra police.)
७)१९०५ पुण्यात विलायती कपड्यांची होळी करण्यात आली.परदेशी मालावर बहिष्कार घालण्यासाठी केलेला अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयत्न होता.(1905 Holi of foreign clothes was celebrated in Pune. This was the first such attempt to boycott foreign goods.)
-----------------------------------------------------------------------
७ ऑक्टोबर | दिन विशेष |October 7 | is a special day|
म्हणी आणि अर्थ
अचाट खाणे मसणात जाणे - अती प्रमाणात कोणतीही गोष्ट घातक ठरू शकते.
-----------------------------------------------------------------------
७ ऑक्टोबर | दिन विशेष |October 7 | is a special day|
आजचा सुविचार
आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे,जी पायथ्यावरून शिखरावर पोह्चाविते.
---------------------------------------------------------------------------
७ ऑक्टोबर | दिन विशेष |October 7 | is a special day|
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा
७ ऑक्टोबर | दिन विशेष |October 7 | is a special day|
0 Comments