BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

नवदुर्गा सन्मान सोहळा संपन्न Navdurga honor ceremony held

 नवदुर्गा |सन्मान सोहळा संपन्न |Navdurga | honor ceremony held


शिराळा:येथील दत्त मंदिर येथे  शिराळा सखी मंच व महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आयोजित केलेल्या नवदुर्गा सन्मान सोहळ्यात प्रसंगी आमदार मानसिंगराव नाईक,सुनीता नाईक,डॉ.शिमोनी नाईक,अश्विनी नाईक,साधना पाटील

नवदुर्गा |सन्मान सोहळा संपन्न |Navdurga | honor ceremony held

शिराळा : कर्तृत्वान महिलांचा सन्मान करून त्यांच्यात आणखी काम करण्याची उमेद निर्माण व्हावी व  त्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा याच उद्देशाने शिराळा सखी मंच व महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने नवदुर्गा सन्मान सोहळ्याचे आयोजन केले असल्याचे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.


 शिराळा येथील दत्त मंदिर येथे  शिराळा सखी मंच व महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आयोजित केलेल्या नवदुर्गा सन्मान सोहळ्यात बोलत होते. यावेळी आपला बझार समूहाच्या अध्यक्ष सुनीतदेवी नाईक अध्यक्षस्थानी होत्या.

नवदुर्गा |सन्मान सोहळा संपन्न |Navdurga | honor ceremony held

यावेळी सुनीता नाईक म्हणाल्या, मनात आणले तर महिला आपणाला अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवतात हे या सत्करमूर्ती महिलांनी सिद्ध करून दाखवले आहे. आपल्या कामात गरुड झेप घेणाऱ्या व प्रसिद्धी पासून दूर असणाऱ्या महिलांचे कौतुक व्हावे.त्यांची प्रेरणा घेऊन इतर महिलांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपले नाव करावे हाच या सन्मान सोहळ्याचा मुख्य उद्देश आहे.

 स्वागत रुपाली कदम यांनी  तर प्रास्ताविक अध्यक्षा साधना पाटील यांनी केले. यावेळी डॉ. ज्योत्स्ना पाटील, नेर्ले (ता. वाळवा)नीलम पाटील (खेड),सुखदा महाजन (शिराळा)  स्वाती भस्मे (शिराळा) तेजस्विनी पवार(जांभळेवाडी), निशा पवार (ढोलेवाडी), वर्षाताई दशवंत (बिऊर), सुजाता पवार,( इटकरे,ता. वाळवा) सावित्रीबाई कदम (शिराळा) , येथील कांताताई पिसे पेठ (ता. वाळवा) यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल त्यांचा  नवदुर्गा म्हणून सन्मान करण्यात आला.



नवदुर्गा |सन्मान सोहळा संपन्न |Navdurga | honor ceremony held

यावेळी डॉ. शिमोनी नाईक, वाळवा तालुका महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्ष सुनीताताई देशमाने यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य अश्विनीताई नाईक, मनीषाताई नाईक, शुभलक्ष्मी नाईक, आरती नाईक, मृणाल नाईक, वैशाली कदम,अर्चना कदम,शिराळा नगराध्यक्ष सुनीता निकम, शहर अध्यक्ष वंदना यादव, डी. एन. मिरजकर, आर. बी. शिंदे, नगरसेवक मोहन जिरंगे मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन वैशाली भुयेकर व एस. एम. पाटील यांनी केले. कल्पना गायकवाड यांनी आभार मानले.

नवदुर्गा |सन्मान सोहळा संपन्न |Navdurga | honor ceremony held

Post a Comment

0 Comments