शिराळा पंचायत समितीच्या सभापतिपदी कणदूर येथील सौ.मनीषा गुरव यांची बिनविरोध निवड झाली.शिराळा पंचायत समितीच्या सभापती सौ. वैशाली माने यांनी पक्षाने दिलेला कालावधी संपल्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्या रिक्त जागेसाठी आज निवडणूक घेण्यात आली होती. या पदासाठी मनीषा गुरव यांचा एकमेव अर्ज असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार गणेश शिंदे यांनी गुरव यांची सभापतिपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
यावेळी माजी सभापती व विद्यमान पंचायत सदस्य सम्राटसिंह नाईक, उपसभापती बाळासाहेब नायकवडी,माजी सभापती विशाली माने, माजी सभापती मायावती कांबळे, पंचायत समिती सदस्या सारिका पाटील, गटविकास अधिकारी संतोष राऊत उपस्थित होते.
निवडीनंतर आमदार मानसिंगराव नाईक व तहसीलदार गणेश शिंदे यांनी नूतन सभापती मनीषा गुरव यांचा सत्कार केला.यावेळी शिराळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विजयराव नलवडे,बाजार समितीच्या उपसभापती नंदाताई पाटील,रामदास गुरव, भागाईवाडीचे माजी सरपंच रामचंद्र पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments