शिराळा शहरासाठी स्वतंत्र प्राथमिक आरोग्य केंद्र, नाट्यगृह व नगर पंचायत इमारतीसाठी प्रयत्नशील- आमदार मानसिंगराव नाईक | MLA Mansingrao Naik strives for independent primary health center, theater and Nagar Panchayat building for Shirala city

शिराळा: शिराळा शहरासाठी स्वतंत्र प्राथमिक आरोग्य केंद्र, नाट्यगृह आणि नगरपंचायत इमारतीसाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले. शिराळा नगरपंचायत तर्फे दिव्यांग कल्याण निधी, आशा स्वयंसेविका प्रोत्साहन भत्ता व प्रधानमंत्री आवास योजना निधीचे वितरण प्रसंगी बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ प्रतिभा पवार होत्या. यावेळी आमदार नाईक म्हणाले, शिराळा शहराला सर्वच सुविधा देण्यासाठी सातत्याने प्राधान्य क्रम दिला आहे. शिराळा तालुक्यातील वाडी वस्तीवर आरोग्य सुविधा पुरविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिराळा शहरासाठी अग्निशमन व स्वच्छ पाणी पुरवठा यंत्रणा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून अडीच एकर जमीन उपलब्ध झाली आहे. गोरक्षनाथ मंदिर परिसरात विकास करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
शिराळा शहरासाठी स्वतंत्र प्राथमिक आरोग्य केंद्र, नाट्यगृह व नगर पंचायत इमारतीसाठी प्रयत्नशील- आमदार मानसिंगराव नाईक | MLA Mansingrao Naik strives for independent primary health center, theater and Nagar Panchayat building for Shirala city
स्वागत व प्रास्ताविक मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी केले. यावेळी माजी नगराध्यक्ष सुनंदा सोनटक्के, सुनील मिरजकर, कल्पना पाटील, यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास नगराध्यक्षा प्रतिभा पवार,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे, विश्वासचे संचालक विश्वास कदम, माजी नगराध्यक्षा सुनीता निकम, सुनंदा सोनटक्के, माजी उपनगराध्यक्ष किर्तीकुमार पाटील,नगरसेवक गौतम पोटे,मोहन जिरंगे, नगरसेविका सुजाता इंगवले तसेच लालासाहेब पवार, प्रमोद पवार,राजु निकम, बसवेश्वर शेटे, गजानन सोनटक्के, अजय जाधव, दिनकर कदम आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अर्चना गायकवाड यांनी केले.तर आभार सुविधा पाटील यांनी मानले.
शिराळा शहरासाठी स्वतंत्र प्राथमिक आरोग्य केंद्र, नाट्यगृह व नगर पंचायत इमारतीसाठी प्रयत्नशील- आमदार मानसिंगराव नाईक | MLA Mansingrao Naik strives for independent primary health center, theater and Nagar Panchayat building for Shirala city
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
0 Comments