BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

जीवन संघर्षमय |असले पाहिजे | लेखिका सोनाली नवांगुळ| Life |should be a struggle | Author Sonali Nawangul |

  जीवन संघर्षमय |असले पाहिजे | लेखिका सोनाली नवांगुळ| Life |should be a struggle | Author Sonali Nawangul |

माजी आमदार स्व वसंतराव नाईक बाबा यांच्या स्मृति प्रतिष्ठान वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना  सोनाली नवांगुळ, खासदार धैर्यशील माने, आमदार मानसिंगराव नाईक, अॅड भगतसिंग नाईक, विराज नाईक विश्वप्रतापसिंग नाईक ,पृथ्वीसिंग नाईक. 

जीवन संघर्षमय |असले पाहिजे | लेखिका सोनाली नवांगुळ| Life |should be a struggle | Author Sonali Nawangul |

शिराळा :जीवनात संघर्ष केला तरच यशाचे शिखर गाठता येते. त्यामुळे जीवन संघर्षमय असले पाहिजे ,असे प्रतिपादन लेखिका सोनाली नवांगुळ यांनी केले. 

शिराळा  येथे माजी आमदार स्व वसंतराव नाईक (बाबा) यांच्या जयंतीनिमित्त वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने  आयोजित केलेल्या जीवन गौरव पुरस्कार  वितरण प्रसंगी बोलत होत्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  आमदार मानसिंगराव नाईक  तर प्रमुख पाहुणे म्हणून  खासदार धैर्यशील माने होते. त अॅड भगतसिंग नाईक,विराज नाईक, विश्वप्रतापसिंग नाईक, पृथ्वीसिंग नाईक, रणजित नाईक यांची प्रमुख उपस्थिती  होती.

जीवन संघर्षमय |असले पाहिजे | लेखिका सोनाली नवांगुळ| Life |should be a struggle | Author Sonali Nawangul |

यावेळी सोनाली नवांगुळ म्हणाल्या, मी जीवनात खूप संघर्ष केला आहे. माझे शिक्षण शाळेत झाले नाही. मला शिक्षणासाठी मोकळे आकाश मिळाले त्यातच माझे शिक्षण झाले. मी सलमा पुस्तकाचे अनुवाद लेखन केले. मला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. प्रत्येकाकडे काही ना काही कमतरता असते त्या कडे दुर्लक्ष करून काम केले पाहिजे. टिकाकार खूप असतात पण आपण आपले ध्येय निश्चित करून वाटचाल सुरू ठेवली कि यश निश्चित मिळते. 

जीवन संघर्षमय |असले पाहिजे | लेखिका सोनाली नवांगुळ| Life |should be a struggle | Author Sonali Nawangul |

यावेळी खासदार धैर्यशील माने म्हणाले, सोनाली नवांगुळ यांच्यामुळे शिराळा गावास सन्मान मिळाला आहे. त्या  अपंगत्वावर  मात करत  फार मोठे काम करत आहेत. आज  समाजातील मानसिक अपंगत्व दूर करण्याची गरज निर्माण झाली आहे. शिक्षणाने मानसिक अपंगत्व दूर होते. 

जीवन संघर्षमय |असले पाहिजे | लेखिका सोनाली नवांगुळ| Life |should be a struggle | Author Sonali Nawangul |

यावेळी आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले, माजी आमदार वसंतराव नाईक बाबा यांनी तालुक्यात उच्च शिक्षणाची सोय केली. तालुक्याचा शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक विकास केला.

 यावेळी दहावी व बारावी तसेच पदवी मध्ये संस्थेत प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली.  प्रा. सुखदेव वाघ, शिवाजी अवघडे,शिक्षकेतर कर्मचारी दिपक गायकवाड यांना आदर्श शिक्षक व गुणवंत सेवक पुरस्कार देण्यात आला.  विशेष जीवन पुरस्कार मरणोत्तर गजानन पाटील रेड यांच्या कुटुंबीयांना तर  आबासाहेब खबाले  यांना खासदार धैर्यशील माने व आमदार मानसिंगराव नाईक व सोनाली नवांगुळ यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला . नागभूमी भूषण पुरस्कार सोनाली नवांगुळ यांना देण्यात आला. विराज नाईक यांचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. 

जीवन संघर्षमय |असले पाहिजे | लेखिका सोनाली नवांगुळ| Life |should be a struggle | Author Sonali Nawangul |

यावेळी आबासाहेब खबाले, विक्रम पाटील, शिवाजी अवघडे यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविक कथाकार अशोक कुभांर यांनी केले. सूत्रसंचालन सुभाष नलवडे व बाजीराव पवळ यांनी केले. आभार संचालक पृथ्वीसिंग नाईक यांनी मानले. 

यावेळी ट्रस्ट चे अध्यक्ष पी. व्ही. पाटील,उदयसिंगराव नाईक, अॅड करणसिंग चव्हाण, सनी पाटील, नगराध्यक्षा सुनिता निकम, सौ नम्रता नाईक,विजयराव नलवडे, भीमराव गायकवाड, संस्थेचे संचालक , प्राचार्य विविध शाखेतील मुख्याध्यापक प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ  उपस्थित होते. 

जीवन संघर्षमय |असले पाहिजे | लेखिका सोनाली नवांगुळ| Life |should be a struggle | Author Sonali Nawangul |

शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा  

Post a Comment

0 Comments